कॅलस म्हणजे काय?
कॅलस म्हणजे आपल्या हातांच्या आणि पायांच्या त्वचेवरील खरखरीत आणि कोरडे चट्टे. ते फक्त त्रासदायक आणि अस्वस्थच नाही, तर बघायला देखील कुरूप असतात. कॅलस ही एक गंभीर समस्या नसली, तरी ती सहजपणे टाळता येते आणि बरी केली जाऊ शकते.
कॅलसला बहुतेक वेळा कॉर्न्स समजले जाते. कॅलस आणि कॉर्न्स हे दोन्ही घर्षणापासून बचावाकरिता बनलेले त्वचेचे कडक असे थर असतात, कॅलस हे कॉर्न्स पेक्षा मोठे असतात, ते कॉर्न्स पेक्षा वेगळ्या जागी बनतात, आणि क्वचितच वेदना देतात.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
कॅलस विशेषत: तळपायावर आणि पायांच्या बोटांजवळ, तळहातावर किंवा गुडघ्यांवर होतात; म्हणजे शरीराचे असे भाग ज्यावर शरीराच्या हालचालींमुळे सर्वात जास्त भार पडतो.,. ते सामान्यतः खालीलप्रमाणे दिसतात
- उंचावलेले आणि कडक गाठी सारखे.
- दाबल्यास दुखतात किंवा पृष्ठभागाखाली नाजूक असू शकतात.
- त्वचेवर जाड आणि खरखरीत चट्टे.
- त्वचा मेणासारखी, कोरडी दिसते आणि पापुद्रे निघतात.
याची मुख्य कारणं काय आहेत?
कॅलसचे मुख्य कारण घर्षण आहे. हे खालील कारणांमुळे सुद्धा होऊ शकते
- खूप घट्ट किंवा सैल पादत्राणे.
- विशिष्ट संगीत वाद्य वाजवल्यामुळे.
- व्यायामशाळेत काही उपकरणांवर व्यायाम केल्याने.
- बॅट किंवा रॅकेट पकडावी लागणारे खळे खेळल्यामुळे.
- दीर्घकाळ पेन/लेखणी पकडून ठेवल्यामुळे.
- लांब अंतरावर सतत सायकल किंवा मोटरबाइक चालवल्यामुळे.
- जोड्यांसोबत मोजे न घातल्यामुळे.
- बुनियन्स, पायात व्यंग किंवा इतर काही विकृती कॅलसची जोखीम वाढवतात.
- कधीकधी, अपुरा रक्त प्रवाह आणि मधुमेह सारख्या विकारांमुळे कॅलस होऊ शकतो.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
डॉक्टरांना प्रभावित क्षेत्राचे एक साधे परीक्षण कॅलस शोधण्यासाठी पुरेसे असते. कॅलस होण्यामागे जर एखादी विकृती असेल तर एक्स-रे चा सल्ला दिला जाऊ शकतो.
बरेचदा, कॅलस स्वत:हुन किंवा घरीच काही उपचार घेतल्याने जातात. डॉक्टर सामान्यतः कॅलससाठी असे सुचवतात:
- कोरडी, जास्तीची त्वचा काढून टाकणे.
- कॅलस काढून टाकण्यासाठी पॅच किंवा औषधे.
- कॅलस पासून सुटका करण्यासाठी सॅलीसायक्लीक ॲसिड वापरणे.
- घर्षण टाळण्यासाठी शु इन्सर्टचा वापर करणे आणि अजून कॅलस टाळणे.
- विकृतीला ठीक करण्यासाठी शस्त्रक्रिया करणे.
- प्युमिस स्टोन किंवा एमरी बोर्ड चा वापर करून, भिजवून, मॉइस्चरायझिंग किंवा मृत त्वचा काढून त्वचा कोमल करणे.
- नेहमी मोज्यांसह चांगले फिटिंगचे जोडे घालावे.