बुनियन्स म्हणजे काय?
बुनियन हा पायाच्या अंगठ्याच्या तळाशी येणारा टेंगूळ आहे. पायाचा अंगणा दुसर्या बोटाकडे झुकल्यामुळे तो एक उंचवटा असल्यासारखा दिसतो. बुनियनमुळे एखाद्याला काहीच अस्वस्थता येत नाही, तर काहींसाठी ते खूप वेदनादायक असू शकते. बुनियन असलेल्यांना त्या सारख्याच लक्षण पायाच्या करंगळीच्या तळाशी सुद्धा असणे सामान्य आहे.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
बुनियन ओळखणे सोपे आहे. येथे काही गोष्टी आहेत ज्या तुमच्या लक्षात येतील:
- आंगठ्याच्या सांध्यावर सूज आणि लालसरपणा येणे.
- एकतर सतत किंवा अधूनमधून वेदना येणे.
- पायाच्या पहिल्या दोन बोटांच्या मध्ये कॅलस आणि/किंवा काॅर्न्स येणे.
- अंगठ्याच्या बाहेरील तळाशी फुगवठा येणे.
याची मुख्य कारणं काय आहेत?
वेगवेगळे घटक बुनियन्स उद्भवण्याचे कारण असू शकतात. ती खालीलप्रमाणे आहेतः
- पायाला झालेली जखम.
- वांशिक व्यंगपणा.
- जन्माच्या वेळीच्या इतर विकृती.
- खूप घट्ट किंवा खूप उंच टाचांची चप्पल घालणे (हे एक विवादात्मक कारण आहे).
- संधी वात.
याचे निदान व उपचार कसे केले जातात?
डाॅक्टरांना बुनियनचे निदान करण्यासाठी पाय तपासणे सामान्यतः पुरेसे असते. पण, कधीकधी डाॅक्टर जखमेची मर्यादा आणि बुनियनच्या मूळ कारणाचे मूल्यांकन करण्यासाठी पायाचा एक्स-रे करणे निवडतात.
बुनियन्सचे उपचार पुराणमतवादी पद्धतीपासून शस्त्रक्रियेपर्यंत असू शकतात. उपचाराची पद्धत स्थितीची तीव्रता आणि अनुभवलेल्या वेदना यावर अवलंबून असते. उपचार पद्धती खालीलप्रमाणे आहेत:
- आरामदायी चप्पल वापरणे.
- वेदना कमी करण्यात आणि अधिक सपोर्ट करण्यासाठी पायवर सपोर्ट पॅड, टेप किंवा स्प्लिंट याचा वापर करणे.
- लालसरपणा आणि वेदना कमी करण्यासाठी त्या भागावर बर्फ चोळणे.
- यासाठी शस्त्रक्रियेची शिफारस केली जाऊ शकते:
- हाडांचा एखादा भाग काढून टाकल्यानंतर पायाचे बोट जोडून सरळ आणि पुन्हा संरेखित करणे.
- अंगठ्याच्या सांध्याच्या भोवती असलेली सूजलेली उती काढून टाकणे.
- प्रभावित सांध्याची हाडे एकत्र करणे.