मेंदुत संसर्ग म्हणजे काय?
मेंदूच्या विविध भागांमध्ये जो संसर्ग होतो त्याचे वर्णन करण्यासाठी मेंदुत संसर्ग ही संज्ञा वापरली जाते. मेंदुत संसर्गामुळे मेनिनजायटीस, ब्रेन ॲबसेस, एन्सेफलायटीस यासारखे आजार होऊ शकतात. मेनिनजायटीस मध्ये मेंदूचे आवरण सूजते, तर एन्सेफलायटिस मध्ये मेंदूच्या टिश्यूवर सूज येते. संसर्ग झाल्यामुळे मेंदूचे टिशू तुटतात ज्याने ॲबसेस म्हणजे पसाची छोटी पिशवी तयार होते.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
मेंदुत संसर्गाची सामान्य लक्षणे खालील प्रमाणे आहेत:
- ताप येणे.
- डोकेदुखी.
- उलट्या.
- मान अकडणे.
- दौरे पडणे.
- अशक्तपणा.
- वागणूकीत बदल होणे.
- पाहण्याची शक्ती कमी होणे.
- बोलणे, शिकणे, स्मरणशक्ती आणि एकाग्रता कमी होणे.
याची मुख्य कारणं काय आहेत?
मेंदुत संसर्ग हा बॅक्टरीया, जीवाणू, बुरशी, किंवा पॅरासाइट्स मुळे होतो. हे सूक्ष्मजीव खालील मार्गाने मेंदू पर्यंत पोहोचतात:
- रक्ताद्वारे - फुफ्फुस, हृदय आणि दातात झालेले संसर्ग मेंदू आणि त्याच्या भागांपर्यंत रक्तातून पोहोचतात. ज्या लोकांची रोगप्रतिकार शक्ती कमकुवत असते किंवा ज्यांना इतर विकार असतात किंवा जी व्यक्ती इम्युनोसप्रेसंट औषधांवर असतात त्यांना मेंदूचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते.
- थेट संपर्काद्वारे - सूक्ष्मजीव शस्त्रक्रियेदरम्यान किंवा खुल्या जखमेतून प्रवेश करू शकतात.
- मेंदूच्या जवळ संसर्ग होणे, जसे कि मध्य कान संसर्ग, मास्टोडायटीस (मॅस्टोइड हाड जे कानाजवळ असते त्यावर सूज), आणि सायनसायटिस.
मेंदूचा संसर्ग होण्यास कारणीभूत असलेले सामान्य जीव खालीलप्रमाणे आहेत:
- टी. गोंडी, टी. सोलियम आणि एस्परगिलस सारखे फंगी.
- एन. मेनिंजिटाईड्स, एस. निमोनिएई, एच. इन्फ्लूएंझेई आणि इतर बॅक्टेरिया.
- चिकनगुनिया विषाणू, हर्पिस झोस्टर आणि सिम्प्लेक्स, सायटोमेगालोव्हायरस आणि वेस्ट नाईल व्हायरससारखे विषाणू.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
आपल्या शरीरात कुठली चिन्हे आणि लक्षणे आहेत त्याच्या आधारावर, आपले डॉक्टर आपली संपूर्ण शारीरिक तपासणी करतील तसेच मेंदू किंवा त्याच्या आवरणांवर सूज आहे का हे बघण्यासाठी एमआरआय किंवा सीटी स्कॅन सारख्या इमेजिंग चाचण्या करायला सांगतील. संसर्गाचे निदान करण्यासाठी, सेरेब्रोस्पायनल फ्लुइड (सीएसएफ) विश्लेषण (लंबर पंक्चर) केले जाते, सीएसएफ पाठीच्या खालच्या भागातून (स्पाइनल कॉलम चा लंबर रिजन) घेण्यात येते आणि सूक्ष्मजीवांचे विश्लेषण केले जाते. रोगास कारणीभूत जीवाणूंना शोधण्यासाठी सामान्य रक्त तपासणी सुद्धा केली जाते.
सूक्ष्मजीवांनुसार, मेंदूच्या संसर्गासाठी अँटीबायोटिक्स, अँटी-व्हायरल किंवा एंटी-फंगल औषधे दिली जातात. औषधांचा कालावधी वेगवेगळा असतो आणि कारणीभूत एजंटवर अवलंबून असतो. जर जीवास धोका असेल तर शस्त्रक्रिया देखील केली जाते.