बोन मेटास्टॅटिस काय आहे?
मेटास्टॅटिस म्हणजे ट्यूमर च्या पेशींचे त्यांनी पहिले प्रभावित केलेल्या अवयवांपासून शरीरातील इतर अवयवांपर्यंत पसरणे. जेव्हा ते शरीरातील हाडांमध्ये पसरते तेव्हा त्याला बोन मेटास्टॅटिस असे म्हणतात. साधारणतः स्तनांचा कॅन्सर किंवा प्रोस्टेट कॅन्सर हाडांमध्ये पसरण्याची शक्यता जास्त असते. सामान्यपणे बोन मेटास्टॅटिसची बाधा मणका, मांडी आणि ओटीपोटाच्या हाडांना होऊ शकते. फुफ्फुसां प्रमाणे हाडांमध्ये होणाऱ्या मेटास्टॅटिसचे निदान उशिरा होते. सामान्यतः बोन मेटास्टॅटिस एक असाध्य रोग आहे जो बरा होऊ शकत नाही.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
कधीकधी बोन मेटास्टॅटिस कोणतेही चिन्हे आणि लक्षणे दाखवत नाही. जेव्हा काही लक्षणे आढळतात तेव्हा ती बाधित हाडाशी निगडीत असतात.
तरीही बाधित हाडा व्यतिरिक्त बोन मेटास्टॅटिस ची आढळणारी इतर काही सामान्य लक्षणे आहेत. ती पुढील प्रमाणे आहेत:
- हाड दुखणे.
- दुखावलेले हाड फ्रॅक्चर असणे.
- लघवी आणि आंत्राच्या हलचालींवरचे नियंत्रण जाणे.
- पाय किंवा हातामध्ये थकवा किंवा वेदना जाणवणे.
- हायपरकॅल्शेमिया (हाडं झिजल्या मुळे रक्तातील कॅल्शियम वाढते) ज्यामुळे हे त्रास होतात
- मळमळ.
- बद्धकोष्ठता.
- मानसिक गोंधळ.
- बेशुद्धी येऊन स्नायू आकुंचणे.
याची मुख्य कारणं काय आहेत?
रक्त किंवा लिम्फ मध्ये जेव्हा कॅन्सरच्या पेशी प्रवेश करतात तेव्हा ते इतर अवयवांपर्यंत जाऊन त्यांच्यावर पण परिणाम करतात. या कॅन्सरच्या पेशी हाडांमध्ये प्रवेश करतात आणि हाडामध्येच वाढणे सुरु करतात. या प्रक्रिये दरम्यान ते परोपजीवी होतात आणि हाडा मधील पोषक तत्वे शोषून घेतात आणि बाधित हाडाला ठिसूळ बनवतात.
खालील हाडांमध्ये पसरणारे सर्वात सामान्य कॅन्सर आहेत:
- स्तनांचा कॅन्सर.
- प्रोस्टेट कॅन्सर.
- मूत्रपिंडाचा कर्करोग.
- फुफ्फुसाचा कर्करोग.
- लिम्फोमा.
- थायरॉईड कॅन्सर.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
संपूर्ण वैद्यकीय इतिहास आणि शारीरिक चाचणीने प्रभावित झालेल्या हाडाबद्दल थोडाफार अंदाज येऊ शकतो. बोन मेटास्टॅटिस साठी रक्त चाचणी क्वचितच केली जाते. अंतिम निदानासाठी इमेजिंग तंत्र वापरले जाते. या इमेजिंग पद्धतीमध्ये यांचा समावेश आहे:
- एक्स-रे.
- बोन स्कॅन.
- कॉम्प्युटेड टोमोग्राफी (सीटी) स्कॅन.
- चुंबकीय अनुनाद इमेजिंग (एमआरआय) स्कॅन.
- पॉझिट्रॉन उत्सर्जन टोमोग्राफी (पीईटी) स्कॅन.
या उपचाराचा उद्देश्य वेदना कमी करणे, फ्रॅक्चर टाळणे आणि इतर हाडांमध्ये पसरण्यापासून थांबवणे हा आहे.
बोन मेटास्टॅटिससाठीच्या उपचार पद्धतींमध्ये याचा समावेश आहे:
- केमोथेरपी एजंट्स - औषधांच्या वापराने कॅन्सर च्या पेशी कमी करणे.
- हार्मोन थेरपी - याच्या मदतीने प्राथमिक ट्यूमर नियंत्रणात आणता येतो जसे की अँड्रॉजन डेप्रिव्हेशन थेरपी ने प्रोस्टेट कॅन्सर पसरण्यापासून नियंत्रित करता येतो. यामध्ये पॅराथायरॉईड हार्मोन ज्यामुळे फ्रॅक्चर हाड ठीक होण्यास मदत होते याचा देखील वापर केला जातो.
- टार्गेटेड थेरपी.
- इम्यूनोथेरपी - यामध्ये कॅन्सरच्या पेशी मारण्यासाठी इम्यूनोग्लोब्युलिन सारख्या इम्यून संस्थेच्या पेशींचा वापर केला जातो.
- बायस्फोस्फोनेट्स - हे लक्षणात्मक आराम देतात म्हणजे हाडांची वेदना कमी करतात, रक्तातील कॅल्शियम चा स्तर कमी करतात, फ्रॅक्चर ची शक्यता कमी करतात आणि त्याचबरोबर हाडांचे नुकसान होण्याची शक्यता पण कमी करतात.
- रेडिएशन थेरपी - प्रभावित हाडांना स्ट्राँशियम-89 आणि रेडियम-223 सारख्या रेडिओआयसोटोप्स ला अनाच्छादित केल्याने कॅन्सर पेशी मारण्यास मदत होते.