उच्च रक्तदाब - High BP (High Blood Pressure) in Marathi

Dr. Nabi Darya Vali (AIIMS)MBBS

January 23, 2017

April 27, 2023

उच्च रक्तदाब
उच्च रक्तदाब

सारांश

उच्च रक्तदाब- ज्याला अतीतणाव देखील म्हणतात, म्हणजे रक्ताचा दबाव रोगाच्या स्थितीपर्यंत जाणे. रक्त रक्तनलिकांच्या (आर्टरी) काठांवर जो भार टाकतो आणि हृदय पंप करीत असताना रक्ताला जो विरोध होतो, त्याला रक्तदाब म्हणतात.दीर्घकालीन उच्च रक्तदाब हृदयाशी संबंधित (कार्डिओव्हॅस्क्युलर) आजारांची पूर्वसूचना आहे.

अतीतणाव दोन भागांत विभागल्या जाऊ शकेल - प्राथमिक किंवा आवश्यक अतीतणाव आणि दुय्यम अतीतणाव. हलका रक्तदाब कुठल्याही लक्षणांशिवाय असू शकतो (असिम्प्टोमॅटीक), म्हणून ज्या लोकांमध्ये रक्तदाब हलका वाढलेला असतो ते त्या स्थितीबद्दल अनभिज्ञ असतात. तरीही तीव्र अतीतणाव असलेल्या लोकांमध्ये डोकेदुखीसारखी धोक्याची लक्षणे दिसून येतात. उच्च रक्तदाब होण्यामागे काही मूलभूत आजार किंवा काही जुळलेले आजार देखील असू शकतात. तरी बरेचदा उच्च रक्तदाबाची कारणे अस्पष्ट असतात. अतीतणावच्या नियोजनात मुख्यतः आहारातील मिठाच्या प्रमाणाला आळा, शारीरिक व्यायाम, आणि रक्त दाबाला नियमित करण्यासाठीची औषधे खूप आहेत. उच्च रक्तदाबाच्या निदानाला आणि त्याच्या उपचाराला विलंब झाल्यास गंभीर गुंतागुंती जसे हृदयविकाराचा झटका (ऍक्युट मायोकार्डियल इन्फार्कशन) किंवा डोळ्यांची इजा (रेटिनोपॅथी) होऊ शकतात. अनेकदा परिणाम मूलभूत कारणांवर आणि उपचारांवर अवलंबून असतात. परिणामांमुळे  अनेकदा मधुमेह झालेले लोक प्रभावित होत असतात. उच्च रक्तदाबाचे नियोजन करण्याकरता जीवनशैलीत बदल करणे आणि आयुष्यभर औषधोपचार करीत राहणे गरजेचे आहे. जसे कि उच्च रक्तदाबाच्या लोकांना त्यांचे औषधोपचारांमध्ये सातत्य ठेवणे कठीण असू शकते. याच कारणास्तव उच्च रक्तदाबाच्या नियोजनात दवाखान्यात वेळोवेळी भेटी, सोबत तपासण्या आणि डॉक्टरांचे समुपदेशन हे महत्वाची भूमिका वठवतात.

उच्च रक्तदाब काय आहे - What is High Blood Pressure in Marathi

मागच्या काही वर्षांमध्ये उच्च रक्तदाब (ज्याला अतीतणाव देखील म्हणतात) भारतात मृत्यूंचे एक महत्वाचे कारण होऊन बसले आहे. हा एक सामान्यतः आढळणारा दीर्घकालीन आजार आहे. एकदा उच्च रक्तदाब विकसित झाला की आयुष्यभर जीवनशैलीतील बदल आणि अतीतणावशामक औषधांचे सेवन खूप आवश्यक होते. हृदयाचे आजार, झटका, इझमिक हृदयरोगआणि मूत्रपिंड निकामी होणे यांच्या मागे उच्च रक्तदाब हे एक खूप महत्वाचे कारण असते. म्हणून, उच्च रक्तदाब जर वेळीच नियंत्रणात आणला नाही,तर त्यासोबत इतरही गंभीर वैद्यकीय परिस्थिती होऊ शकतात. एखाद्या व्यक्तीला उच्च रक्तदाबाचे धोके आणि त्यांचे उपचार त्या व्यक्तीच्या जीवनशैली, आहाराच्या सवयी, आणि पारिवारिक उच्च रक्तदाबाचा इतिहास यावर अवलंबून आहे. वयाच्या तिसाव्या वर्षानंतर नियमित तपासणी करावी जेणेकरून रक्त दाब आणि इतरही आजारांवर देखरेख ठेवता येईल. घरी उच्च रक्तदाबावर देखरेखीसाठी स्वयंचलित इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा वापर करता येतो. या उच्च रक्तदाब मोजणाऱ्या उपकरणांना सहजपणे हाताळता येते आणि मोजमाप करणे देखील सोपे असते. उच्च रक्तदाबाचे रुग्ण दरवर्षी झपाट्याने वाढत आहेत आणि २०२० पर्यंत हे एक सर्वांत अधिक मृत्यूंचे आणि अपंगत्वाचे कारण असेल.

myUpchar doctors after many years of research have created myUpchar Ayurveda Hridyas Capsule by using 100% original and pure herbs of Ayurveda. This Ayurvedic medicine has been recommended by our doctors to lakhs of people for problems like high blood pressure and high cholesterol, with good results.
BP Tablet
₹691  ₹999  30% OFF
BUY NOW

उच्च रक्तदाब ची लक्षणे - Symptoms of High Blood Pressure in Marathi

उच्च रक्तदाबाचे एक खूप महत्वाचे वैशिष्ट्य असे की, उच्च रक्तदाब हा लक्षात न येता देखील एखाद्याला असू शकतो,कारण बहुतेक वेळी त्याची काहीही लक्षणे दिसतच नाहीत. उच्च रक्तदाबाचे लोक त्यांच्या या परिस्थितीबद्दल अनभिज्ञ असतात. म्हणून, तुमच्या डॉक्टराकडे नियमित भेटी झाल्या पाहिजेत जेणेकरून रक्त दाबाच्या पातळीतील कुठलाही बदल नजरेतून सुटणार नाही. तुम्हाला अनियंत्रित रक्तदाब असेल तर तुम्हाला खालील लक्षणे दिसतील:

  • तीव्र डोकेदुखी - तुम्हाला उच्च रक्तदाबामुळे डोक्यात जडपणा किंवा वेदना जाणवेल.
  • थकवा किंवा संभ्रम - तुम्हाला कमजोरी किंवा कणकण वाटेल किंवा संभ्रमाची जाणीव होईल.
  • दृष्टिदोष - तुम्ही दृष्टीतील अस्पष्टता किंवा दुहेरी दृष्टी अनुभवाल.
  • श्वसनाचा त्रास - तुम्हाला जाणवेल कि तुम्हाला श्वास घेणे कठीण होत आहे.
  • घाबरल्यासारखे होणे - तुम्हाला तुमच्या हृदयाचे ठोके जाणवतील.
  • लघवीत रक्त येणे - एखादवेळी लघवीचे गडद किंवा हलके तपकिरी रंगाचे होणे तुमच्या लक्ष्यात येईल.

उच्च रक्तदाब चा उपचार - Treatment of High Blood Pressure in Marathi

उच्च रक्तदाब समूळ बरा  होत नसला तरीही, अधिक गुंतागुंती टाळण्यासाठी योग्य काळजीने आणि अँटीहायपरटेन्सिव्ह औषधांनी नियंत्रित करता येतो. डॉक्टरांनी घेतलेल्या रक्तदाबाच्या मोजमापावरून उच्च रक्तदाबाचे उपचार केले जातात. साधारणपणे दोन किंवा अधिक मोजणी उपचाराआधी आवश्यक आहेत.

  • जर तुमचा सरासरी रक्तदाब १२०/८० एमएमएचजी किंवा कमी असेल तर तुमचे डॉक्टर तुम्हाला निरोगी जीवनशैली आणि निरोगी आहार घेऊन वाढत्या रक्त दाबाला विकसित होण्यास टाळायचा सल्ला देतील.
     
  • जर तुमचे आकुंचनातील रक्तदाब (सिस्टोलिक बीपी) १२०-१२९ एमएमएचजी परंतु प्रसरणातील रक्तदाब (डायस्टोलिक बीपी) ८० एमएमएचजी च्या कमी असेल तर डॉक्टर तुमचे निदान रक्तदाब वाढत असणारे रुग्ण म्हणून अतीतणावपूर्व या श्रेणीत करतील. या पायरीवर तुम्हाला औषधांची गरज भासणार नाही परंतु दिनचर्येत आहाराचे नियमन आणि व्यायामांनाजागाकरूनद्यावीलागेल. तुमचे डॉक्टर तुम्हाला दर पंधरा दिवसांनी घरी इलेक्ट्रॉनिक उपकरणावर किंवा दवाखान्यात जाऊन रकदाबावर नजर ठेवायला सांगतील.
     
  • जर तुमचे आकुंचनातील रक्तदाब (सिस्टोलिक बीपी) १३०-१३९ एमएमएचजी परंतु प्रसरणातील रक्तदाब (डायस्टोलिक बीपी) ८०-८९ एमएमएचजी च्या कमी असेल तर तुम्हाला पहिल्या स्तराचे अतीतणाव आहे. या बाबतीत डॉक्टर तुम्हाला एक किंवा अधिक अँटी-हायपरटेन्सिव्ह औषधे, सोबतच आहारातील फेरबदल, व्यायाम आणि बीपी वरील देखरेख शिस्तीत ठेवायचा सल्ला देतील.
     
  • जर तुमचे आकुंचनातील रक्तदाब (सिस्टोलिक बीपी) १४० एमएमएचजी किंवा जास्ती आणि  प्रसरणातील रक्तदाब (डायस्टोलिक बीपी) ९०-किंवा जास्ती एमएमएचजी च्या कमी असेल तर तुम्ही अतीतणावच्या दुसऱ्या पायरीवरआहात किंवा उच्च रक्तदाबाचे रुग्ण झाला आहात. या बाबतीत डॉक्टर तुम्हाला एक किंवा अधिक हायपरटेन्सिव्ह औषधे घ्यायचा, आहारात फेरबदल करण्याचा आणि बीपी देखरेख कडक शिस्तीत करायला सांगतील व दैनंदिन व्यायामाचा सल्ला देतील.
     
  • अतीतणावनाशक औषधे म्हणून कॅल्शिअम चॅनेल ब्लॉकर्स, एसीई  इन्हिबिटर, बीटा-ब्लॉकर्स , आणि डाययुरेटिक्स वापरली जातात. यापैकी एक औषध किंवा दोन व जास्त औषधांच्या संयोगांनी उच्च रक्तदाब नियंत्रणात आणण्यात मदत होते. डॉक्टर तुमच्या उपचारांसाठी औषधांची निवड तीव्रता, रक्तदाबाचे मोजमाप, वय, आणि औषधांच्या उपलब्धतेवर करतात.  
     
  • अँटी-हायपरटेन्सिव्ह औषधे (न थांबता नियमितपणे घेतल्यास), सोबत मिठावरील प्रतिबंध, तणावांना टाळणे, आणि दैनंदिन जीवनात व्यायामाचा मागोवा या डॉक्टरच्या सल्ल्यानुसार केलेल्या गोष्टींनी तुम्हाला रक्तदाबावर प्रभावीपणे नियंत्रण मिळविण्यात मदत होते. या उपायांनी उच्च रक्तदाबामुळे होणाऱ्या पुढील गुंतागुंती टळू शकतात.

निरोगी जीवनशैलीसाठीचे फेरबदल असे आहेत.

  • निरोगी आहार
    तळलेले, जंक फूड खाणे बंद करा, हिरव्या भाज्या, ताजी फळे, आणि पूर्ण धान्य यांचा आहारात समावेश करा.
  • मद्यपान कमी करा
    मद्य, तंबाखू यांचा वापर कमी करा जमल्यास पूर्णपणे टाळा जेणे करून रक्तदाब सामान्य होण्यास मदत होईल.
  • कमीमिठाचा वापर आणि डबाबंद आहार घ्यायचे टाळा,कारण त्यात सोडिअमचे प्रमाण अधिक असते.
  • तंदुरुस्त रहा
    चालणे आणि धावण्यासारखे साधे व्यायाम जसे तुमच्या दैनंदिन जीवनात आचरल्याने तुमचा रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि तुम्ही तंदुरुस्त देखील राहता.तुम्ही पोहणे, अति-तीव्र व्यायाम, परंतु फक्त तुमच्या डॉक्टरच्या सल्ल्याने आणि तज्ञाच्या देखरेखीखाली सुद्धा करू शकता.
  • तणावांचे नियोजन
    तणाव देखील उच्च रक्तदाबाचा महत्वाचे कारण असू शकते. तणावांना आणि रक्तदाबाला  नियोजित करणारे उपक्रम जसे योगासने, ध्यान, गहन श्वसनक्रियेचे व्यायाम सुरु करावे.

जीवनशैली व्यवस्थापन

उच्च रक्तदाबाचे रुग्ण म्हणून जर तुमचे निदान झाले असेल तर जीवनशैलीतील बदल खूप मदत करतात. तुमच्या दैनंदिन जीवनात फेरबदल करणे उच्च रक्तदाबावर नियंत्रण मिळविण्यास अतिशय आवश्यक आहे. निरोगी जीवनशैलीकडे नेणारे निरोगी उपाय तुमच्या औषधांची मात्राकमी करून रक्तदाबावर नियंत्रण मिळवतात जेणेकरून पुढील गुंतागुंती टळतील. हे बदल असे आहेत:

  • वजनावर लक्ष ठेवा
    हा रक्तदाबावर नियंत्रण मिळविण्याचा सर्वाधिक प्रभावी उपाय आहे कारण वाढलेले वजन रक्तदाब वाढीस लावते तर वाढलेला रक्तदाब आणखी वजन वाढवितो. लठ्ठपणा हा वाढत्या रक्तदाबात धोक्याचा घटक आहे. तुम्ही तुमच्या उंची आणि वयाच्या हिशोबाने योग्य वजन ठेवण्याचे ध्येयठरवायला हवे. एक आदर्श बॉडी-मास इंडेक्स १८ आणि २४.५ केजी/मी२ असायला हवा.
  • नियमित व्यायाम करा
    रोगांना टाळायला तुमच्या दैनंदिन जीवनात व्यायाम सामील करणे अतिशय आवश्यक आहे. आठवड्यातील ५ दिवस रोज ३० मिनिटे चालणे अशा उपक्रमांनी तुमचा रक्तदाब नियंत्रणात राहायला मदत होते. सर्वोत्तम निकालांसाठी नियमित व्यायाम अतिशय गरजेचे आहे. पोहणे, नाचणे, धावणे, इत्यादी व्यायामअसे आहेत जे तुम्ही रोजच्या आचरणात आणू शकता. कुठलाही व्यायामप्रकार सुरु करायच्या आधी डॉक्टरांचा किंवा  तज्ञांचा सल्ला जरूर घ्या.
  • डॅश (DASH ) आहाराचा पाठपुरावा
    निरोगी आहार उत्तम तब्येतीची किल्ली आहे. निरोगी आहारात पूर्ण धान्ये, भाज्या, फळे, आणि कामी चरबीचे डेअरी पदार्थ समाविष्ट होतात.प्रक्रिया केलेले चरबीयुक्त आणि चांगली कर्बोदके असलेले अन्नघ्या. या आहाराला डायटरी अप्रोचेस टू स्टॉप अतीतणाव (उच्च रक्तदाब थांबविण्यासाठीची आहारांची हाताळणी) आहार म्हणतात. चांगल्या निरोगी आहारासाठी तुम्ही स्वतःला प्रेरित करीत राहणे अतिशय आवश्यक आहे कारण आहारासंबंधित तुमच्या जुन्या सवयी बदलणे खूप कठीण असते.स्वयंपाकघरात आजार देणारे खाद्यपदार्थ ठेऊ नका जेणेकरून मनविचलितझाल्यामुळे तुमचे आहाराचे ताळतंत्र बिघडवाल.
  • मिठाच्या सेवनावर नियंत्रणठेवा
    तुम्हाला रक्तदाब नियंत्रणात ठेवायचा असल्यास आहारातील सोडिअमची मात्रा कमी करणे अतिशय आवश्यक आहे. नेहमी अन्नाच्या लेबल वरील सामग्री वाचा. तुमचे डॉक्टर तुम्हाला मीठ कमी किंवा बंद करण्यास सांगतील. आधीच तयार केलेल्या जेवणावर वरून मीठ घेणे हानिकारक असते.
  • मद्यसेवनावर ताबा मिळावा.
    मद्य ठराविक प्रमाणात घेतल्यास हृदयासाठी चांगले असू शकते परंतु अति सेवनाचे धोके संभवतात. तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडून मद्याच्या परिणामांविषयी समजून घ्याआणि सेवनाचेप्रमाणठरवा.
  • धूम्रपान सोडा
    धूम्रपान रक्तदाब वाढविते. तुम्ही हळूहळू सिगारेटीचे धूम्रपान कमी करून ते सोडून द्या जेणेकरून तुम्ही हृदयाचे आजार विकसित होणे टाळू शकाल आणि पूर्ण शारीरिक आरोग्य साधू शकाल.
  • तणावाचे नियोजन करा
    तणावांनी पूर्ण असेलेली जीवनशैली रक्तदाब वाढवायला कारणीभूत ठरते. तणावांपासून मुक्त राहण्यासाठी शांत रहा आणि ध्यान शिका व स्वतःचा रक्तदाब नियंत्रणात ठेवा.
  • तुमच्या डॉक्टरांच्या भेटी घ्या
    भेटींची नियमितता आणि तपासण्या तुमच्या रक्तदाबावर देखरेख ठेवण्यास मदत करतात आणि तुमचे डॉक्टर उपचारांचे परिणाम लक्षात घेऊन जरुरी वाटल्यास हवे ते बदल सुचवू शकतात. तुम्ही जरी निरोगी असाल तरी रक्तदाबाच्या नियमित तपासणीने तुम्हाला उच्च रक्तदाबाचे निदान, तुम्ही लक्षणे दाखवत नसाल तरीही होऊ शकते.
  • मदत मिळावा
    निरोगी आयुष्य जगायला परिवार आणि मित्रांचा आधार मिळविणे अतिशय आवश्यक आहे कारण ते तणाव कमी करण्यास मदत करतात.


संदर्भ

  1. Roy A, Praveen PA, Amarchand R, et al. Changes in hypertension prevalence, awareness, treatment and control rates over 20 years in National Capital Region of India: results from a repeat cross-sectional study. BMJ Open 2017;7:e015639. doi: 10.1136/bmjopen-2016-015639
  2. Kayce Bell, June Twiggs, Bernie R. Olin. Hypertension: The Silent Killer. Alabama pharmacy Association; 2015.
  3. Center for Disease Control and Prevention [internet], Atlanta (GA): US Department of Health and Human Services; High Blood Pressure
  4. Whelton PK, He J, Appel LJ, Cutler JA, Havas S, Kotchen TA, Roccella EJ, Stout R, Vallbona C, Winston MC, Karimbakas J. Primary prevention of hypertension: clinical and public health advisory from The National High Blood Pressure Education Program.. National High Blood Pressure Education Program Coordinating Committee. JAMA. 2002 Oct 16;288(15):1882-8. PMID: 12377087.
  5. Center for Disease Control and Prevention [internet], Atlanta (GA): US Department of Health and Human Services; Preventing High Blood Pressure: Healthy Living Habits
  6. Chobanian AV, Bakris GL, Black HR, Cushman WC, Green LA, Izzo JL Jr, Jones DW, Materson BJ, Oparil S, Wright JT Jr, Roccella EJ. Seventh report of the Joint National Committee on Prevention, Detection, Evaluation, and Treatment of High Blood Pressure.. Joint National Committee on Prevention, Detection, Evaluation, and Treatment of High Blood Pressure. National Heart, L
  7. Thasvi Kareem, Sudha M J, Ramani PT, Ashkar Manakkalavalappil, Parvathy G. Prescription pattern of antihypertensive drugs in a tertiary care hospital in Kerala and adherence to JNC-8 guidelines.. Universal Journal of Pharmaceutical Research. 2018; 3(3): 1-3.

उच्च रक्तदाब साठी औषधे

Medicines listed below are available for उच्च रक्तदाब. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.

Lab Tests recommended for उच्च रक्तदाब

Number of tests are available for उच्च रक्तदाब. We have listed commonly prescribed tests below: