सारांश
उच्च रक्तदाब- ज्याला अतीतणाव देखील म्हणतात, म्हणजे रक्ताचा दबाव रोगाच्या स्थितीपर्यंत जाणे. रक्त रक्तनलिकांच्या (आर्टरी) काठांवर जो भार टाकतो आणि हृदय पंप करीत असताना रक्ताला जो विरोध होतो, त्याला रक्तदाब म्हणतात.दीर्घकालीन उच्च रक्तदाब हृदयाशी संबंधित (कार्डिओव्हॅस्क्युलर) आजारांची पूर्वसूचना आहे.
अतीतणाव दोन भागांत विभागल्या जाऊ शकेल - प्राथमिक किंवा आवश्यक अतीतणाव आणि दुय्यम अतीतणाव. हलका रक्तदाब कुठल्याही लक्षणांशिवाय असू शकतो (असिम्प्टोमॅटीक), म्हणून ज्या लोकांमध्ये रक्तदाब हलका वाढलेला असतो ते त्या स्थितीबद्दल अनभिज्ञ असतात. तरीही तीव्र अतीतणाव असलेल्या लोकांमध्ये डोकेदुखीसारखी धोक्याची लक्षणे दिसून येतात. उच्च रक्तदाब होण्यामागे काही मूलभूत आजार किंवा काही जुळलेले आजार देखील असू शकतात. तरी बरेचदा उच्च रक्तदाबाची कारणे अस्पष्ट असतात. अतीतणावच्या नियोजनात मुख्यतः आहारातील मिठाच्या प्रमाणाला आळा, शारीरिक व्यायाम, आणि रक्त दाबाला नियमित करण्यासाठीची औषधे खूप आहेत. उच्च रक्तदाबाच्या निदानाला आणि त्याच्या उपचाराला विलंब झाल्यास गंभीर गुंतागुंती जसे हृदयविकाराचा झटका (ऍक्युट मायोकार्डियल इन्फार्कशन) किंवा डोळ्यांची इजा (रेटिनोपॅथी) होऊ शकतात. अनेकदा परिणाम मूलभूत कारणांवर आणि उपचारांवर अवलंबून असतात. परिणामांमुळे अनेकदा मधुमेह झालेले लोक प्रभावित होत असतात. उच्च रक्तदाबाचे नियोजन करण्याकरता जीवनशैलीत बदल करणे आणि आयुष्यभर औषधोपचार करीत राहणे गरजेचे आहे. जसे कि उच्च रक्तदाबाच्या लोकांना त्यांचे औषधोपचारांमध्ये सातत्य ठेवणे कठीण असू शकते. याच कारणास्तव उच्च रक्तदाबाच्या नियोजनात दवाखान्यात वेळोवेळी भेटी, सोबत तपासण्या आणि डॉक्टरांचे समुपदेशन हे महत्वाची भूमिका वठवतात.