सारांश
संक्रामक घटक आणि त्यांचे विषारी पदार्थ त्यांच्या मूळ स्थानावरून रक्तप्रवाहात पसरतात ज्याला रक्ताचे संसर्ग म्हणून ओळखले जाते. सुक्ष्मजीव संक्रमणाचे हे प्रगत चरण आहे. रक्त संसर्ग ही एक गंभीर अवस्था आहे जी जीवनासाठी घातक असू शकते, म्हणून त्यावर त्वरित गहन उपचारांची आवश्यकता असते. रक्त संसर्गाच्या लक्षणांमध्ये शरीराच्या तापमानात वाढ किंवा घट होणे, हृदययाच्या ठोक्यांची गती वाढणे आणि श्वसनदर वाढणे समाविष्ट आहे. रक्तदाब आणि शरीराचे तापमान मोजणे, मूत्र प्रकार आणि संपूर्ण रक्त गणना यासारख्या तपासणीच्या चाचण्यांसह संपूर्ण शारीरिक तपासणी, योग्य निदान करण्यासाठी आवश्यक आहे. रक्त तपासणी सामान्यत: पांढर्या रक्त पेशी संख्येत लक्षणीय वाढ दर्शवते. रक्ताच्या संसर्गाचे उपचार आजाराच्या अवस्थेच्या तीव्रतेवर आणि नैदानिक प्रकटीकरण (चिन्हे आणि लक्षणे) यावर अवलंबून असते. उपचारांमध्ये औषधांच्या मदतीने रक्तदाबावर नियंत्रण मिळवणे, द्रव्ये आणि प्रतिजैवीके देणे, या सगळ्यांसोबत अतीदक्षता विभागामधील उपचारांचा समावेश असू शकतो. रक्त संसर्गाचे परिणाम अपुरे आहेत कारण, उपचार सुरू होइपर्यंत एक किंवा अधिक अवयव व्यवस्थित कार्ये करणे बंद करू शकतात. परिणाम यामुळे देखील अपुरे आहेत कारण रक्ताच्या संसर्गाचे नेमके स्रोत शोधणे कठीण आहे.