शौच मध्ये रक्त जाणे - Blood in Stool in Marathi

Dr. Rajalakshmi VK (AIIMS)MBBS

December 26, 2018

March 06, 2020

शौच मध्ये रक्त जाणे
शौच मध्ये रक्त जाणे

सारांश

विष्ठेमध्ये रक्ताचे अस्तित्त्व म्हणजेच रेक्टम या भागामधून रक्तगळती. ते सामान्यपणें शौचालयात विष्ठा केल्याने किंवा शौचानंतर पुसण्यासाठी वापरल्या जाणार्र्या टॉयलेट पेपरवरून लक्षात येते. रेक्टममधून रक्तगळती असे सूचित करते की, पचनतंत्राच्या वरील किंवा वरील भागातून रक्त गळत आहे. रक्तगळतीची सुरवात तोंडापासून गुदद्वारापर्यंत कुठेही होऊ शकते. गुदद्वारामधील चीर आणि मूळव्याधामुळे असे होऊ शकते. याबरोबर पोटात दुखणें किंवा अशक्तपणा यांसारखी लक्षणेही असू शकतात. काही वेळा रक्तगळती एखाद्या अंतर्निहित आजाराची सूचना असते आणि म्हणून तात्काळ वैद्यकीय सल्ला आवश्यक असतो. संपूर्ण रक्तगणती (कंप्लीट ब्लड काउंट) आणि कोलोनोस्कोपी यांसारख्या वैद्यकीय अन्वेषण रेक्टम या भागामधून रक्तगळती होत असलेल्या लोकांमध्ये केल्या जातात. विष्ठेतील रक्तस्रावावरील उपचार त्यामागील अंतर्निहित कारणावर अवलंबून आहे आणि डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालीच केले गेले पाहिजे.

शौच मध्ये रक्त जाणे ची लक्षणे - Symptoms of Blood in Stool in Marathi

विष्ठेत रक्त येणें म्हणजे स्वतःतच एखाद्या अंतर्निहित रोगाचे अथवा परिस्थितीचे कारण असते. परिस्थितीच्या निदानाची सहायक इतर लक्षणे खालीलप्रमाणे आहेत:

  • पोटदुखी होणें
    ही वेदना गट अल्सर किंवा आंतडीतील क्षता (अल्सर) , गट या भागातील दाह किंवा कोणत्याही प्रकारच्या कर्करोगाशी निगडीत असू शकते. (पुढे वाचा - पोटदुखीचे उपचार)
  • बेशुद्ध पडणें
    रक्ताच्या हानीमुळे तुम्हाला घेरी (चक्कर) येऊ शकते किंवा डोके हलके वाटू शकते.
  • अशक्तपणा
    रक्ताच्या हानीमुळे तुम्हाला थकवा किंवा अशक्तता येऊ शकते.
  • कॉफीच्या रंगाची उलटी
    कॉफीच्या रंगाची उलटी असल्यास, जठर किंवा ईसोफेगसमधून रक्त गळत असल्यामुळे ते होऊ शकते आणि तुम्ही डॉक्टरांना त्वरीत संपर्क साधायला हवे.
  • मलनिःसारणाच्या वेळी वेदना
    विष्ठेत रक्तासह विष्ठा करतांना वेदना असू शकते, जे विशिष्टपणें मूळव्याध किंवा गुदद्वारातील चिराचे लक्षण आहे.

शौच मध्ये रक्त जाणे चा उपचार - Treatment of Blood in Stool in Marathi

उपचार संपूर्णपणें अंतर्निहित कारणावर अवलंबून आहे. यामध्ये सामील आहेः

  • आश्वासन
    विष्ठेत रक्तस्राव झाल्यास तुम्हाला तणाव येऊ शक्ते आणि तुमच्या डॉक्टरांनी अशा वेळी तुम्हाला आश्वस्त केले पाहिजे. म्हणून, विष्ठेत रक्तस्राव झाल्याझाल्या लगेच तुम्ही डॉक्टरांशी बोलावे.
  • समुचित आहार
    तुमचे डॉक्टर तंतूमय आहार उदा. हिरव्या पालेदार भाज्या, ताजी फळे, सलाद आणि फळांचे रस घेण्याचा सल्ला देऊ शकतात. तसेच, मलनिःसारण सुकर होण्यासाठी व मूळव्याध आणि फिशर असल्यास रक्तस्रावाची शक्यता कमी करण्यासाठी भरपूर तरळ पदार्थ व पाणी घ्या.
  • लौह पूरक पोषक तत्त्वे
    रक्ताच्या हानीमुळे, तुमच्या हीमोग्लोबिनमध्ये घट येऊ शकते. हे साधारणपणें लौहाच्या कमतरतेअंती झालेल्या रक्तक्षयामुळे होते. अशावेळी, तुमचे डॉक्टर तुम्हाला लौह पूरक पोषक तत्त्वे घेण्याचा सल्ला देतात.
  • औषधे
    तुमचे डॉक्टर पोटातील आम्ल कमी करण्यासाठी प्रोटोन पंप इन्हिबिटर, दाह असल्यास स्टेरॉयड आणि जिवाणू नष्ट करण्यासाठी प्रतिजैविके लिहून देऊ शकतात.
  • कॉटेराइझेशन
    सक्रीय रक्तस्रावाचे स्त्रोत आढळल्यास; तुमचे डॉक्टर कॉटेराइझेशन (या पद्धतीमध्ये प्रभावित भाग विद्युत्धारेद्वारे सीलबंद केले जाते) चा सल्ला देऊ शकतात.
  • बॅंडिंग
    यामध्ये रक्तसंचार पूर्णपणें थांबवण्यासाठी मूळव्याधाभोवती एक घट्ट रबरी बॅंड गुंडाळले जाते.
  • स्क्लेरोथेरपी
    यामध्ये, मूळव्याधात एक रासायनिक पदार्थ इंजेक्शनद्वारे देऊन मूळव्याध संकुचन पावण्यास आणि रक्तस्राव थांबण्यास मदत होते.
  • शस्त्रक्रिया
    सक्रीय स्थानातून रक्तस्राव थांबवण्यास आणि गाठींच्या बाबतीत हे शेवटचे पर्याय असते. बिगर शस्त्रक्रिया पद्धतींनी बरे न झालेल्या आणि आकारात मोठे असलेल्या मूळव्याधासाठी, हॅमरॉडॅक्टॉमीद्वारे मूळव्याध काढून रक्तस्राव थांबवले जाते.

जीवनशैली व्यवस्थापन

विष्ठेतून पुढील रक्तहानी टाळण्यासाठी, खालील बदल करण्याचा सल्ला डॉक्टर देऊ शकतातः

  • ताण देणें टाळणें
    तुम्हाला मूळव्याध मलनिःसारणाच्या वेळी ताण दिल्यास रक्तस्रावाची शक्यता वाढते. ताण देणें भरपूर पाणी व तंतुमय आहार घेतल्याने आणि रोज व्यायाम केल्याने थांबू शकते.
  • तंतूमय आहार घेणें
    आहारात तंतू वाढल्यास, मूळव्याध आणि फिशरच्या लक्षणांमध्ये आराम मिळते आणि रक्तस्रावाशिवाय सुकर मलनिःसारणही होते.
  • मद्यपान टाळणें
    अत्यधिक मद्यपान करणें विष्ठेत रक्त निघण्यासाठी धोक्याच्या घटकांपैकी एक आहे. म्हणून प्रमाण कमी करण्याचे प्रयत्न करावे किंवा शक्यतो पूर्णपणें मद्यपान थांबवावे.
  • भरपूर द्रव्ये घेणें
    फळांचे रस इ. तरळ पदार्थ व कमीत कमी 3-4 लिटर पाणी घेतल्यास, विष्ठा सहज होते आणि मलनिःसारणही सुकर होते.
  • ताणतणाव टाळणें
    तणावामुळे पेप्टिक अल्सर होणें विष्ठेतून रक्तस्रावाच्या प्रमुख कारणांपैकी आहे. तणाव व्यवस्थापनाच्या प्रभावी पद्धती शोधणें समस्येचे समाधान सहज होण्यास मदत करते.
  • घातक खोकल्याच्या कारणीभूत परिस्थितींचे योग्य उपचार
    दमा, ब्रॉंकाइटिससारख्या परिस्थितींमुळे घातक खोकला होऊन वेळीच उपचार न केल्यानेही विष्ठेतून रक्तस्राव होऊ शकतो. म्हणून अशा परिस्थितींमध्ये डॉक्टरांचा नेहमी सल्ला घ्या.
myUpchar doctors after many years of research have created myUpchar Ayurveda Urjas Energy & Power Capsule by using 100% original and pure herbs of Ayurveda. This Ayurvedic medicine has been recommended by our doctors to lakhs of people for problems like physical and sexual weakness and fatigue, with good results.
Power Capsule For Men
₹719  ₹799  10% OFF
BUY NOW

शौच मध्ये रक्त जाणे काय आहे - What is Blood in Stool in Marathi

विष्ठेत रक्त असणें किंवा निघणें एखाद्या अंतर्निहित परिस्थितीचे महत्त्वपूर्ण लक्षण आहे आणि म्हणून या अवस्थेचे सखोल अन्वेषण व्हायला हवे. विष्ठेत रक्त असल्याचे कारण मूळव्याध किंवा गुदद्वारातील चिरापासून गट अल्सर अथवा गट कॅंसरसारख्या गंभीर परिस्थितींमुळे असू शकते. रक्ताची मोठ्या प्रमाणात हानी होत असल्यानेच तुम्हाला शौचालयात डबक्यात रक्त तुम्ही पाहू शकाल. विष्ठेत रक्त दिसल्यास, रक्ताच्या रंगाकडेही (ते गडद लाल किंवा काळसर लाल आहे का याकडे) लक्ष देणे आवश्यक आहे. त्याने रक्तगळतीचे स्त्रोत समजणें तुमच्या डॉक्टरांना सुकर होईल. शारीरिक चाचणी कारण ओळखण्यात मदतीची असू शकते; म्हणून तुमच्या डॉक्टरांना परीक्षणासाठी भेट देणे आवश्यक आहे. कोणत्याही रुग्णाला सुरवातीला वैद्यकीय मदत मिळवण्यात लाज वाटू शकते. पण म्हणून, या परिस्थितीची उपेक्षा करता कामा नये आणि तुम्ही कोणत्याही गंभीर आजाराची शक्यता नाकारता यावी, म्हणून योग्य तो वैद्यकीय सल्ला मिळवला पाहिजे. याप्रमाणे, अशा परिस्थितींमध्ये वैद्यकीय समुपदेशन नेहमी मदतीचे राहिले आहे आणि असेल.

विष्ठेत रक्त म्हणजे काय?

विष्ठेमध्ये रक्ताचे अस्तित्त्व म्हणजेच शौचालयाच्या डबक्यात  किंवा शौचानंतर पुसण्यासाठी वापरल्या जाणार्र्या टॉयलेट पेपरवर रक्त दिसत असण्याची परिस्थिती. रक्त विष्ठेत मिसळलेले सुद्धा असू शकते आणि रुग्णाची विष्ठा तेव्हा काळसर लाल रंगाची दिसते.



संदर्भ

  1. National Institute of Diabetes and Digestive and Kidney Diseases [internet]: US Department of Health and Human Services; Gastrointestinal (GI) Bleeding .
  2. Acosta RD, Wong RK. Differential diagnosis of upper gastrointestinal bleeding proximal to the ligament of Trietz.. Gastrointest Endosc Clin N Am. 2011 Oct;21(4):555-66. PMID: 21944410
  3. Bounds BC, Friedman LS. Lower gastrointestinal bleeding. Gastroenterol Clin North Am. 2003 Dec;32(4):1107-25. PMID: 14696299
  4. Gisbert JP, Gonzalez L, de Pedro A, Valbuena M, Prieto B, Llorca I, Briz R, Khorrami S, Garcia-Gravalos R, Pajares JM. Helicobacter pylori and bleeding duodenal ulcer: prevalence of the infection and role of non-steroidal anti-inflammatory drugs. Scand J Gastroenterol. 2001 Jul;36(7):717-24. PMID: 11444470
  5. Ting-Chun Huang, Chia-Long Lee. Diagnosis, Treatment, and Outcome in Patients with Bleeding Peptic Ulcers and Helicobacter pylori Infections. Biomed Res Int. 2014; 2014: 658108. PMID: 25101293
  6. Chaudhry V, Hyser MJ, Gracias VH, Gau FC. Colonoscopy: the initial test for acute lower gastrointestinal bleeding.. Am Surg. 1998 Aug;64(8):723-8. PMID: 9697900
  7. Laine LA. Helicobacter pylori and complicated ulcer disease.. Am J Med. 1996 May 20;100(5A):52S-57S; discussion 57S-59S. PMID: 8644783

शौच मध्ये रक्त जाणे साठी औषधे

Medicines listed below are available for शौच मध्ये रक्त जाणे. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.

Lab Tests recommended for शौच मध्ये रक्त जाणे

Number of tests are available for शौच मध्ये रक्त जाणे. We have listed commonly prescribed tests below: