सारांश
विष्ठेमध्ये रक्ताचे अस्तित्त्व म्हणजेच रेक्टम या भागामधून रक्तगळती. ते सामान्यपणें शौचालयात विष्ठा केल्याने किंवा शौचानंतर पुसण्यासाठी वापरल्या जाणार्र्या टॉयलेट पेपरवरून लक्षात येते. रेक्टममधून रक्तगळती असे सूचित करते की, पचनतंत्राच्या वरील किंवा वरील भागातून रक्त गळत आहे. रक्तगळतीची सुरवात तोंडापासून गुदद्वारापर्यंत कुठेही होऊ शकते. गुदद्वारामधील चीर आणि मूळव्याधामुळे असे होऊ शकते. याबरोबर पोटात दुखणें किंवा अशक्तपणा यांसारखी लक्षणेही असू शकतात. काही वेळा रक्तगळती एखाद्या अंतर्निहित आजाराची सूचना असते आणि म्हणून तात्काळ वैद्यकीय सल्ला आवश्यक असतो. संपूर्ण रक्तगणती (कंप्लीट ब्लड काउंट) आणि कोलोनोस्कोपी यांसारख्या वैद्यकीय अन्वेषण रेक्टम या भागामधून रक्तगळती होत असलेल्या लोकांमध्ये केल्या जातात. विष्ठेतील रक्तस्रावावरील उपचार त्यामागील अंतर्निहित कारणावर अवलंबून आहे आणि डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालीच केले गेले पाहिजे.