बेनीन फायब्रोसिस्टिक ब्रेस्ट म्हणजे काय?
बेनीन फायब्रोसिस्टिक ब्रेस्ट हा रोग स्तनामध्ये (नॉन कॅन्सरस) गाठी किंवा धाग्यासारखे स्ट्रेचेस असतील तर होतो. या नॉन कॅन्सरस गाठी बहुधा स्तनाच्या बाहेरच्या किंवा वरच्या भागात आढळतात. 20 ते 50 वयोगटातील स्त्रियांमध्ये हा सहसा दिसून येतो.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
हॉर्मोनल बदलामुळे सहसा मासिक पाळीच्या आधी आणि पाळी दरम्यान बेनीन फायब्रोसिस्टिक ब्रेस्ट चे लक्षणं अधिक दिसतात. याची लक्षणे अशी आहेत:
- स्तना मध्ये वेदना. (अधिक वाचा: स्तन दुखण्याची कारणं)
- स्तनाला स्पर्श केल्यावर हुळहुळ वाटणे.
- स्तन जड वाटणे किंवा सुजणे.
- स्तना मध्ये गाठी असणे.
- निप्पल डिस्चार्ज.
- मासिक पाळीआधी स्तन जास्त दुखणे.
स्तनामधील गाठी लवचिक आणि मऊ वाटतील. हाताने स्पर्श केल्यास, त्या थोड्या सरकल्यासारख्या वाटतील. मासिक पाळी आधी या गाठी थोड्या मोठ्या होऊ शकतात.
हे जाणून घेणे महत्वाचे आहे की बेनीन फायब्रोसिस्टिक ब्रेस्टमुळे ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता वाढते असे नाही. बेनीन फायब्रोसिस्टिक ब्रेस्ट हा आजार हानिकारक नसून तो उपचाराने पूर्णपणे बरा होऊ शकतो.
याची मुख्य कारणं काय आहेत?
फायब्रोसिस्टिक ब्रेस्टचं नेमकं कारणं अजून डॉक्टर्स शोधू शकले नाहीत. पण, जास्तीत जास्त डॉक्टर्स म्हणतात की एस्ट्रोजेनसारख्या प्रजनन हार्मोनमुळे हा रोग होत असावा. मेनोपॉज नंतर हा रोज क्वचितच होतो, त्यामुळे डॉक्टरांचे असे म्हणणे आहे की प्रजनन च्या वयात हॉर्मोनल बदल हे एकच कारण असू शकतं.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
फायब्रोसिस्टिक ब्रेस्ट चे निदान कारणासाठी पहिल्यांदा शारीरिक तपासणी केली जाते, यामुळे डॉक्टर गाठी कुठे आहेत आणि ब्रेस्ट टिश्यू मध्ये काही वेगळेपणा आहे का हे बघू शकतात. शारीरिक तपासणी नंतर, आजाराची निश्चिती करण्यासाठी डॉक्टर मॅमोग्राम आणि ब्रेस्ट अल्ट्रासाऊंड सारख्या इमेजिंग टेस्ट करण्याचा सुद्धा सल्ला देऊ शकतात.
त्यानंतर, टिशू बायोप्सी टेस्ट द्वारे गाठी हानिकारक आहे की नाही हे बघितले जाऊ शकते.
जर रुग्णात काही लक्षणे दिसत असतील तरच उपचार केले जातात. उपचारांमध्ये वेदना आणि हुळहुळ कमी होण्यासाठी औषधे देतात.पण, सहसा डॉक्टर स्वतःची काळजी कशी घ्यावी आणि आजार कसा ठीक करावा हे समजवून सांगतात. ते असे:
- व्यवस्थित फिट होणारी ब्रा घालावी.
- वेदना कमी होण्यासाठी शेकावे.
- ज्याने पोटात जळजळ होणार नाही असे पदार्थ खावे.
जर लक्षणं गंभीर असतील तर, वेदना आणि हुळहुळ कमी करण्यासाठी, डॉक्टर गर्भ निरोधक गोळ्या किंवा इतर काही औषधे देऊ शकतात.