बेल्स पाल्सी काय आहे?
बेल्स पाल्सी हा एक असा रोग आहे ज्यामध्ये चेहऱ्याच्या एका बाजूचे स्नायू कमकुवत होतात किंवा एका बाजूला पक्षघात होतो. जर या स्नायूंपर्यंत जाणाऱ्या नसा खराब झाल्या तर ही समस्या होते. परंतु, या स्नायुंवर तात्पुरता परिणाम होतो, आणि उपचार केल्यावर ते पूर्णपणे बरे होते.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
- बेल्स पाल्सीमुळे चेहऱ्याचा एका बाजूच्या स्नायूंवरचं परिणाम होतो. सुमारे 1% लोकांमध्ये, दोन्ही बाजूंवर परिणाम होतो.
- चेहऱ्याच्या हालचाली नियंत्रित करणाऱ्या नसांवर परिणाम होतो. रुग्णांना डोळे मिचकावण्यास, ज्या बाजूवर परिणाम झाला आहे त्या बाजूने तोंड उघडण्यास, हसण्यास आणि चावण्यास त्रास होतो.
- चेहऱ्याच्या ज्या बाजूवर परिणाम झाला आहे तिथे दुखू शकतं, मुख्यतः जबडा आणि डोक्यामध्ये.
- स्नायू अशक्त झाल्यामुळे, डोळ्याच्या पापण्या खाली झुकतात आणि तोंडातून लाळ गळते.
- जिभेच्या पुढील भागाने चव ओळखता येत नाही.
याची मुख्य कारणं काय आहेत?
-
बेल्स पाल्सी ची नेमकी कारणं माहित नाहीत; पण, असे म्हंटले जाते असे अनेक व्हायरल इन्फेक्शन्स आहेत ज्यामुळे हा रोग होतो. जसे की हर्पिस सिम्प्लेक्स, हर्पिस झोस्टर, एचआयव्ही, सायटोमेगालोव्हायरस आणि एपस्टाईन बार व्हायरस.
या रोगाचे काही रिस्क फॅक्टर्स असे आहेत:
- मधुमेह.
- गर्भावस्था, विशेषत: शेवटचे तीन महिने.
- जर कुटुंबात हा रोग आधी कोणाला झाला असेल तर.
चेहऱ्याच्या नसांना झालेली कुठलीही दुखापत, सूज किंवा नुकसान यामुळे सुद्धा बेल्स पाल्सी होऊ शकतो.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
याचे निदान शारीरिक तपासणी, इमेजिंग आणि ब्लड टेस्ट द्वारे केले जातात.
- रोगाचे लक्षणं बघून डॉक्टर चेहरा तपासतात, आणि डोळ्याच्या पापण्या झुकल्या आहेत का, तोंडातून लाळ गळते का हे बघतात.
- एमआरआय किंवा सीटी स्कॅनसारख्या इमेजिंग तंत्रांच्या साहाय्याने चेहऱ्याचे स्नायू तपासले जातात.
- जर व्हायरल इन्फेकशन झाल्यासारखे वाटत असेल, तर डॉक्टर ब्लड टेस्ट करायला सांगतात.
- स्ट्रोक, लाइम रोग आणि ब्रेन ट्यूमर सारखे इतर रोग वगळून निदान करण्यात येते.
बेल्स पाल्सी चे उपचार हे रोगाची कारणं आणि रिस्क फॅक्टर्स वर खूप अवलंबून आहे.
- कॉर्टिकोस्टेरॉईड्स हे सामान्यतः दिल्या जाणाऱ्या औषधांपैकी एक आहे. त्यामुळे 6 महिने आराम मिळतो. पण, सुरुवातीलाच स्टेरॉईड्सने उपचार सुरू करणे महत्वाचे आहे.
- जर व्हायरसमुळे हा रोग झाला असेल, तर अँटीव्हायरल औषधे दिली जाऊ शकतात.
- औषधांबरोबर, फिजियोथेरपीच्या मदतीने स्नायूंचा व्यायाम देखील करावा लागतो.
- काही गंभीर केसेस मध्ये, जर नस दबली असेल किंवा दुखापत झाली असेल, तर सर्जरी करून दबाव कमी केला जाऊ शकतो.
- हा रोग काही महिन्यातच बरा होतो आणि शक्यतोवर परत होत नाही.