सारांश
तोंडाची दुर्गंधी म्हणजे श्वासोच्छवासाच्या वेळी तोंडातून बाहेर पडणारा तीव्र दुर्गंध आहे.वैद्यकीय परिभाषेत तोंडाच्या दुर्गंधीला हेलिटोसिस किंवा ओरल मालोडर म्हणून ओळखतात.कुठल्याही स्रोतापासून का असेना ,शरीरातून(तोंडातून किंवा शरीरातून) येणाऱ्या दुर्गंधीला हेलिटोसिस म्हणतात.परंतु ओरल मालोडर म्हणजे तोंडावाटे श्वासोच्छवासाची दुर्गंधी येणे होय. संशोधकांचा असा अनुमान आहे की तोंडाची दुर्गंधी जगभरात मोठ्या प्रमाणातील लोकांना प्रभावित करते.दुर्गंधी बर्र्याचदा दुर्लक्षित केली जाते आणि त्यामुळे पीडित लोक लक्षणीय रीत्या मानसिक आणि सामाजिक अंपंगत्वाला सामोरे जातात. तोंडाच्या दुर्गंधीचे सर्वात सामान्य कारण जींजीवलसारखे सूक्ष्मजीव आहेत जे सामान्यत: आपल्या हिरड्यांवर व जिभेवर एक थर बनवतात. सुदैवाने, तोंडाची योग्य स्वच्छता आणि डॉक्टरांनी विहित केलेली विशिष्ट औषधे बहुतांश वेळा ओरल मालाडोरपासून पूर्णपणे बरे करण्यात यशस्वीपणे मदत करतात.
तुम्हाला ही माहिती आहे काय?
पुरुष आणि महिलांना समान प्रमाणांमध्ये तोंडाच्या दुर्गंधीचा त्रास होतो,परंतु अभ्यासांवरून दिसून येते की स्त्रिया पुरुषांपेक्षा आधी मदत आणि उपचार घेतात.डॉक्टरांनी असा दावा केला आहे की दुर्गंधी कमीत कमी वैद्यकीय सेवा घेऊन ही बरी होते. तथापि काही अंतर्भूत वैद्यकीय आजारांमुळे देखील शरीर आणि तोंडाला दुर्गंध येऊ शकतो.म्हणून त्याकडे दुर्लक्ष करू नका, जर 15 दिवसांपेक्षा जास्त काळापूर्वी पासून सतत तोंडाला दुर्गंध येत असेल,तर कृपया तत्काळ दंतचिकित्सक किंवा नाक-कान-घसा तज्ज्ञांचा सल्ला घ्या.