अॅथलीट फूट म्हणजे काय ?
अॅथलीट फूट हे पायात होणारे फंगल इन्फेक्शन आहे, जो सामान्यतया पायांमधील बोटांच्या त्वचेवर प्रभाव पाडतो. हे सामान्यता: अॅथलीट्स माणसांवर शारीरिक व्यायाममुळे घडून येते. या रोगाच्या संसर्गासाठी टिनिया ही बुरशी जबाबदार आहे, म्हणून अशा रोगाला टिनिया पेडीस देखील म्हणतात.
त्याचे मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
- ॲथलीट फूटने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला अंगठ्या दरम्यान खाज आणि जळजळ होते.
- त्वचा कोरडी होऊन लाल होते, तसेच प्रभावित झालेली त्वचा अत्यंत भयानक दिसते.
- कधी कधी पायांवर अल्सर किंवा फोड, त्याच बरोबर थोडा रक्तस्त्राव होतो.
- नखे कालांतराने ठिसूळ आणि खराब होतात.
- प्रभावित झालेल्या क्ष्रेत्रात वारंवार स्पर्श केल्याने हा संसर्ग हाताला आणि इतर भागांमध्ये पसरतो.
मुख्य कारणं काय आहेत?
- बुरशीमुळे होणारा संसर्ग जसे मायक्रोस्पोर्म हे अॅथलीट फूट होण्यासाठी जबाबदार आहे. हा एक संसर्गजन्य रोग आहे जो याच्या स्पर्शाने किंवा संसर्गित मोजे, बीछान्याने इ. च्या माध्यमातून पसरु शकते.
- क्वचितच, बॅक्टेरिया आणि सोरायसिस देखील हा संसर्ग करु शकतात.
- ओलावा, अशुद्ध पाय किंवा नखात घाण यामुळे या संसर्गास बळी पडू शकतात.
- सार्वजनिक ठिकाणी अनवाणी चालणे किंवा दुसऱ्यांचे मोजे वापरणे हे अॅथलीट फूट संबंधित काही जोखीमेचे घटक आहेत. ऑफिसची जागा, जिमखाना आणि स्विमिंग पूल असे सार्वजनिक भागात इन्फेक्शन होणेची शक्यता असते.
- मधुमेहाने ग्रस्त व्यक्तीला किंवा एड्ससारख्या रोगांमध्ये कमी प्रतिकारशक्तीच्या परिस्थितीमुळे अशा प्रकारचे संसर्ग होऊ शकते.
- अतिप्रमाणात घाम येणे हे देखील या रोगासाठी एक उपयुक्त घटक आहे.
याचे निदान आणि उपचार कसे केले जाते?
- पायाची तपासणी करून डॉक्टरांना रोगाचे निदान करण्यास मदत होते. कधीकधी, जर कारणे निश्चित नसल्यास तर, पूर्तेतेसाठी पायांमधील टिशूचे/ त्वचाचे बायोप्सी केली जाते.
- या स्थितीच्या उपचारांमध्ये पुढील समाविष्ट आहे:
- अँटी-फंगल औषधे, जे या रोगावर औषधोपचारानुसार उपलब्ध आहेत. हे औषध साधारणतः 4 आठवड्यांपर्यंत निर्धारित केली जाते, तसेच औषधाचे प्रमाण हे रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते.
- जर का हा आजार बॅक्टरीयामुळे झाला असेल तर अँटी-बॅक्टेरियल औषधे देतात.
- दररोज पाय स्वच्छ ठेवणे आणि सार्वजनिक ठिकाणी पायांची काळजी ठेवणे महत्वाचे आहे. जर फंगस (बुरशी) पूर्णपणे नष्ट न झाल्यास संसर्गाची पुनरावृत्ती होईल.
स्वत: ची काळजी
- ओलसर किंवा घाणेरडे मोजे आणि बूट घालण्यापासून टाळा.
- घरात परतताच आपले पाय स्वच्छ करा, खासकरून सार्वजनिक ठिकाणी जाऊन आल्यास.
- टॉवेल, रुमाल, मोजे वगैरे दुसऱ्या बरोबर वापरू नये.
- आपल्या पायांचे रक्षण करण्यासाठी पूर्णपणे पायांना झाकलेले शूज किंवा सँडल घाला.