सारांश
चिंताविकार अशी एक तीव्र भावना आहे,जी शारीरिक बदलांसह शरीराच्या प्रतिकारप्रणालीला कमजोर करते. चिंताविकाराचा सामान्यत: एकच प्रकार अनुभवला जातो किंवा तीन प्रकार एकत्रितपणे अनुभवलेजातात:चिंताविकार, अनिवार्य झपाटलेपणाची विकृती व इतर संबंधित अवस्था, मानसिक आघात आणि मानसिक तणावा संबंधित चिंताविकार. हा विकार सौम्य, मध्यम, तीव्र आणि उच्चतम अशा भिन्न पातळींवर असू शकतो. चिंताविकार होण्याची कारणे प्रामुख्याने भावनिक व वैद्यकीय समस्या, विशिष्ट आजार, मद्यपान आणि मादक पदार्थांचे अतिसेवनही आहेत. शिवाय, कौटुंबिक इतिहास हा चिंताविकारामागील महत्वाचा घटक आहे. लक्षणांमध्ये छातीतील धडधड(हृदयाच्या ठोक्यांचा गतीत वाढ)वाढणे,घाबरण्याची भावना येणे, खूप घाम येणे, मळमळ होणे व गुंगी येणे, आणि झोप न येणे यांचा समावेश असतो.औषधे आणि समुपदेशन, हे दोन्ही एकत्रितपणे करणे ही उपचारांची सर्वमान्य पद्धत आहे. सावध रहण्यासह जीवनशैलीत सुधारणा करणे अत्यंत महत्वाचे आहे कारण चिंताविकार उलटून परतीने येण्याची शक्यता अधिक असते. चिंताविकाराच्या गुंतागुंतींमध्ये वागणुकीतील समस्या उदा. एकाग्रतेची कमतरता असणे आणि कार्य पूर्ण करण्यात असमर्थ असणे,इतर शारीरिक आजार जसे हृदयविकाराची समस्या असणे,अनिद्रा आणि अपचनाच्या समस्या होणे,मानसिक आरोग्य समस्या जसे फोबिआ होणे,आत्महत्येची प्रवृत्ती तयार होणे आणि अतिरेकी झटके येणे यांचा समावेश होतो.