अमीबियासिस काय आहे?
अमीबियासिस हा एक आतड्यांचा संसर्ग आहे जो अँटामीबा नामक परजीवी मुळे होतो. हा आजार ओळखण्यासाठी काही भाकड कथा आहेत, पण सामान्यतः तुम्हाला जास्त लक्षणे दिसून येणार नाहीत.जर अमीबियासिसचा वेळेत उपचार केला नाही तर याचा धोका वाढू शकतो कारण या परजीवीचा संसर्ग इतर अवयवांमध्ये पण पसरू शकतो.
अमीबियासिसची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
परजीवी किंवा सिस्ट ने शरीरात प्रवेश केल्यानंतर 1 ते 4 आठवड्यांमध्ये लक्षणे दिसण्यास सुरुवात होते. बरेचदा, काहीच लक्षणे नसतात किंवा साधारण लक्षणे दिसून येतात. सामान्यतः दिसणारे लक्षणे ही आहेत:
- ओटीपोटात किंवा पोटात कळ.
- अतिसार
- अस्वस्थता किंवा मळमळ.
- पोटात गॅस वाढणे.
- शौचामध्ये रक्त.
पण, एकदा का परजीवीने शरीरातील अवयवात स्वतः ला वसवलं की मग ते गंभीर नुकसान पोहचवू शकतात,जसे की:
- गंभीर संसर्ग
- फोड किंवा पस होणे.
- आजारपण.
- मृत्यू.
साधारणतः आतडे आणि यकृत हे परजीवीचे हल्ला करण्याचे सर्वात सामान्य स्थान आहे.
अमीबियासिसचे मुख्य कारणं काय आहेत?
प्रोटोझोआ किंवा परजीवी ज्यामुळे अमीबियासिस होतो त्याला ई. हिस्टोलायटीका असे म्हणतात. अन्न किंवा पाणी द्वारे जेव्हा याचे सिस्ट शरीरात जातात तेव्हा हे परजीवी शरीरात प्रवेश करतात. याचा संसर्ग असलेल्या रुग्णांच्या विष्ठेशी जर संपर्क आला तर अमीबियासिस होऊ शकतो.
एकदा सिस्ट ने शरीरात प्रवेश केला की मग हे परजीवी सिस्ट मधून बाहेर येऊन शरीरातील इतर अवयवात पसरायला सुरुवात करतात. आतडी किंवा कोलन मध्ये ते पसरण्याची अधिक शक्यता असते. मल किंवा विष्ठेतून हे परजीवी किंवा सिस्ट बाहेर येऊन हा संसर्ग पसरवू शकतात.
अमीबियासिस चे निदान आणि उपचार कसे केले जातात?
साधारणतः याचे निदान करताना काही गोष्टी बघण्यात येतात, जसे की:
- प्रवासाचा आणि अलीकडील तब्येतीच्या माहितीचा संपूर्ण इतिहास.
- सिस्ट साठी शौचाची तपासणी.
- यकृताची कार्यक्षमता तपासण्यासाठी चाचण्या.
- यकृतातील विकृती किंवा जखम तपासण्यासाठी अल्ट्रासाउंड किंवा सीटी स्कॅन करणे.
- यकृतामध्ये फोड असेल तर सुईने तो फोडता येतो का ते बघणे.
- कोलन मध्ये परजीवी आहे का हे तपासण्यासाठी कोलोनोस्कोपी करणे.
याचा उपचार खूप साधा आणि सोपा आहे. या उपचाराचे मुख्य उद्देश्य परजीवी पसरण्यापासून थांबवणे आणि त्याला पूर्णपणे नष्ट करणे हे आहे .यामध्ये खालील समाविष्ट आहेत:
- 10 ते 14 दिवसांसाठी चालू असणारे औषधोपचार (मेट्रोनायडेझोल).
- जर या परजीवीने एखाद्या अवयवाचे नुकसान केल्याचे दिसून येत असेल तर याच्या उपचारामध्ये फक्त परजीवी काढून टाकणे एवढेच नसून, याचे मुख्य ध्येय त्या अवयवाची कार्यप्रणाली पूर्वरत करण्याचा प्रयत्न करणे असेल. कोलन किंवा पेरिटोनियल टिश्यू (ओटीपोटाचे अवयव झाकणारे टिश्यू) मध्ये असेल तर त्यासाठी शस्त्रक्रिया केली जाण्याची शक्यता आहे.