अल्झायमर म्हणजे काय?
अल्झायमर (एडी) हा एक असा रोग आहे ज्यात स्मृती कमी होत जाते, याची लक्षणे पूर्णपणे बरी करता येत नाही आणि रोग दिवसेंदिवस वाढतच राहतो. हा एक प्रकारचा डिमेन्शिया (स्मरणशक्ती कमी होणे) आहे. ज्या विकारांनी मेंदूच्या कार्यांमध्ये कायमची हानी होते त्यास डिमेन्शिया म्हणतात, अशा विकारांमध्ये शेवटी दैनंदिन जीवनातील साध्या साध्या गोष्टी करणे सुद्धा कठीण होऊन जाते. डिमेन्शिया चे प्रमाण भारतात 4 दशलक्षांपेखा जास्त आहे. पण, ही एक जागतिक आरोग्य समस्या असून, कमीत कमी 50 दशलक्ष लोकांना कोणत्या ना कोणत्या प्रकारचा डिमेन्शिया असतो.
अल्झायमरची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
एडीची सुरवात तिशी ते साठी च्या दरम्यान होऊ शकते, आणि उशीरा होणारा एडी साठीत होतो. जसा रोग वाढतो तशी मेंदूला जास्त हानी होते, आणि याचा प्रसार प्रत्येक व्यक्तीत वेगवेगळा असतो.
ह्या विकाराचे 3 टप्पे आहेत:
- सौम्य
एखादी व्यक्ती सामान्यपणे काम करू शकते पण अचानक काही गोष्टींचा विसर पडू शकतो, जसे की जागेचे नाव विसरणे किंवा काही नेहमीचे शब्द न आठवणे. योग्य नाव न आठवणे, नुकत्याच घडलेल्या गोष्टी विसरणे, वस्तू कुठे ठेवल्या आहेत ते विसरणे आणि नियोजन किंवा आयोजन करता न येणे ही इतर काही लक्षणे आहेत. - मध्यम
याची लक्षणे जास्त काळ टिकत असून, यात अलीकडल्याच घडामोडी विसरणे किंवा स्वतःबद्दल विसरणे, भांबावल्यासारखे होणे, लोकांमध्ये न मिसळणे, काहींमध्ये लघवी आणि मलविसर्जनाचे नियंत्रण जाणे, आणि सभोवताल किंवा वस्तुस्थितीशी संपर्क न राहणे अशी लक्षणे दिसतात. - गंभीर
याची लक्षणे पर्यावरणातील उत्तेजकांना किंवा साध्या संभाषणांना प्रतिसाद न देणे, आणि इतरांवर पूर्णपणे निर्भर राहणे आहेत.
अल्झायमरची मुख्य कारणं काय आहेत?
कारणे अज्ञात आहेत; शाश्त्रज्ञांना अल्झायमर रुग्णाच्या मेंदूमध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने जमा झाल्याची आढळतात. ही जास्तीची प्रथिने मेंदूच्या नेहमीच्या कार्यांमध्ये अडथळा आणतात आणि अखेरीस यामुळे मृत्यू होऊ शकतो. उपलब्ध माहितीनुसार, वाढत्या वयात अल्झायमर होण्याची जास्त जोखीम असते. वयानुसार होणारे मज्जातंतूंतील बदल (मेंदूचे काही भाग आकुंचित होणे, सुजणे, आणि फ्री रॅडिकल्सचे उत्पादन होणे) आणि शेवटी अल्झायमर पसरणे याचे संशोधन विविध प्रयोगांद्वारे सुरु आहे. लवकर होणारा अल्झायमर हा सहसा अनुवांशिक असतो आणि क्वचितच होतो, तर उशिरा होणारा प्रकार हा अनुवांशिकता, जीवनशैली, आणि पर्यावरणातील काही घटक यांच्या एकत्र येण्याने होतो आणि हा जास्त कॉमन आहे.
अल्झायमरचे निदान आणि उपचार कसा केले जातात?
व्यक्तीचे मानसिक बळ आणि मेंदूचे इतर कार्य विविध वेळी तपासण्यासाठी अल्झायमरच्या निदानात अनेक चाचण्या केल्या जात. त्या अशा:
- वागण्यात आणि व्क्तीमत्वात झालेले बदल आणि मेडिकल हिस्टरी.
- लघवी, रक्त आणि स्पायनल फ्लुइड च्या चाचण्या.
- ब्रेन स्कॅन्स (सिटी किंवा एमआरआय).
आजपर्यंत अल्झायमरचा पूर्ण उपचार उपलब्ध नाही पण औषधांनी डिमेन्शिया नियंत्रित करता येतो. अल्झायमरची मूळ कारणे शोधून त्यास विलंबित करण्यासाठी किंवा टाळण्यासाठी शास्त्रज्ञांचा अभ्यास सुरु आहे.
शक्य असणारे काही उपचार असे असू शकतात:
- अल्झायमरशी निगडित असेलेले विकार जसे हृदयाचे विकार आणि टाईप 2 मधुमेह यांचा उपचार करणे.
- सुधारित विचार प्रक्रियांसाठी आणि अस्वस्थता, व्याकुळता, आक्रमकता आणि नैराश्य नियंत्रित करण्यासाठी मानसिक प्रशिक्षण.
- काही विशिष्ट आहार जसे कि मेडिटेरेनियन किंवा चरबीचे प्रमाण कमी असलेला आणि हायपरटेन्शन थांबवणारा आहार (डीएएसएच).
- व्यायाम.
- अरोमाथेरपी.
- गाणी किंवा नृत्य यात रमणे.
- प्राण्यांच्या-साहाय्याने थेरपी.
- सुखावह अशी मालिश.
- मल्टि-सेन्सरी स्टिम्यूलेशन.
जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी उपचार आणि त्यांचे निरिक्षण अनुभवी व्यक्तींनी करणे आवश्यक आहे.