अ‍ॅलर्जी - Allergy in Marathi

Dr. Rajalakshmi VK (AIIMS)MBBS

January 26, 2019

March 06, 2020

अ‍ॅलर्जी
अ‍ॅलर्जी

सारांश

अलर्जी ही एक सामान्य आरोग्य स्थिती असते, ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकार प्रणाली परकीय पदार्थ किंवा एलर्जी संप्रेरकाला अतीप्रतिरोध करते, ज्याची अधिकतर लोकांमध्ये कसलीची प्रतिक्रिया होत नाही. अलर्जीची तीव्रता व्यक्तीपरत्त्वे वेगळी असते आणि जळजळीसारखी सौम्य आणि अॅनाफिलेक्झिसही असू शकते, जी एक प्राणघातक वैद्यकीय आपत्स्थिती आहे. बहुतेक अलर्जी बर्र्या होऊ शकत नाहीत, तथापी, अनेक लक्षणे शमवण्यासाठी बरेच उपचार उपलब्ध आहेत.

अ‍ॅलर्जी काय आहे - What is Allergy in Marathi

जगभरातील सर्व सामान्य आजारांपैकी अलर्जी एक आहे. एलर्जीची लक्षणे सौम्य असू शकतात किंवा काही लोकांमध्ये ते जीवघेणीही असू शकतात. 20 व्या शतकाच्या सुरूवातीस अलर्जी एक दुर्लभ रोग मानला जात होता, पण अलीकडे अलर्जी वाढत गेलेली आरोग्य समस्या म्हणून उदयास आली आहे. संशोधन दाखवतात की, जवळजवळ 20% युरोपीय लोक नेहमीच  दमा किंवा एनाफिलॅटिक झटक्याच्या किंवा अगदी मृत्यूच्या भयाखाली जीवन जगतात. जागतिक अलर्जी संघटनेप्रमाणें, कोणत्याही देशाच्या लोकसंख्येच्या अंदाजे 10-40%  लोक अलर्जी विकारांनी प्रभावित आहेत.व्यक्तीमध्ये, अलर्जी  सामान्यतः त्यांच्या उमेदीच्या काळात प्रकट होते, ज्यामुले ते आपला खूप वेळ गमावतात. भारतातही, अलर्जीचा धोका सतत वाढत आहे. हे एकूण भारतीय लोकसंख्येच्या 20 ते 30% दमा, राइनीटीस, खाद्यपदार्थांची अलर्जी, एक्झेमा, अर्टीकॅरिआ, एनफ्लॅक्ससिअ आणि एंजिमोडेमायुक्त अलर्जींनी ग्रस्त असल्याचे नोंदवले  गेले आहे.

अलर्जी काय आहे?

अलर्जी रोगप्रतिकार प्रणाली अतीसंवेदनशील होण्याची एक अवस्था आहे.  ती एखाद्या पदार्थाला शरीराच्या रोगप्रतिकार शक्तीची एक प्रतिक्रिया असते, ज्यामुळे बहुतांश लोकांनी कसलीची हानी नाही. निरोगी लोक, रोगप्रतिकार प्रणाली एखाद्या जंतूविरुद्ध लढते, तथापि, ऍलर्जी असलेल्या लोकांना, रोगप्रतिकार प्रणाली एक जंतू  नसलेल्या पदार्थालाही अतीप्रतिक्रीया देते. ज्या लोकांना अलर्जी आहे ते सामान्यतः एका प्रकारच्या पदार्थापेक्षा संवेदनशील असतात. अलर्जीसंबंधी रोगांमध्ये पर्यावरण आणि आनुवंशिक घटक दोन्ही महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

myUpchar doctors after many years of research have created myUpchar Ayurveda Urjas Capsule by using 100% original and pure herbs of Ayurveda. This ayurvedic medicine has been recommended by our doctors to lakhs of people for sex problems with good results.
Long Time Capsule
₹712  ₹799  10% OFF
BUY NOW

अ‍ॅलर्जी ची लक्षणे - Symptoms of Allergy in Marathi

विविध प्रकारच्या अलर्जीच्या लक्षणेमध्ये हे समाविष्ट होते:

धुळीची एलर्जी

ऍलर्जीक राहिनाइटिस

  • नाक गळणें किंवा पडसे.
  • डोळे आणि त्वचेत खाज होणें.
  • शिंका येणे.
  • नाकातील अडथळ्यामुळे खराब झोपल्यामुळे थकवा आणि अंग गळून सारखे वाटणें.

त्वचेची अलर्जी

त्वचा आलर्जीच्या सामान्य लक्षणे म्हणजे लालसरपणा, खोकला आणि सूज. काही किरकोळ फरक आहेत.जे विशिष्ट त्वचेच्या परिस्थितींचे निदान करण्यात मदत करू शकतात.

  • एक्जिमा आणि संपर्क डर्माटायटीस
    एक्जिमा असलेल्या लोकांची त्वचा नेहमीच कोरडी, खाजकारक व खळपी असते. काही लोकांमध्ये खाजवल्यास, खळप्यांमध्ये संक्रमणामुळे एक द्रव्य बाहेर पडते. मुलांमध्ये, एक्जिमाचा प्रभाव चेहरा, सांध्याचे वळण व कानांवरही होतो. प्रौढांना त्याच ठिकाणी आणि हात व पायांवरही चिरा पडतात. संसर्गजन्य डर्माटायटिसमध्ये, अशीच लक्षणे एलर्जी संप्रेरक किंवा धातूच्या संपर्काच्या स्थळी दिसतात.
  • अर्टीकॅरिआ
    अर्टीकॅरिआमध्ये, त्वचा लाल व दाह झालेली दिसते आणि लाल उभारीचे पर्वत तिथे आणि शरीराच्या कोणत्याही भागावर दिसू शकतात. एंजियोएडेमा नावाची परिस्थिती असू शकते, ज्यामध्ये त्वचेची गहन थरही प्रभावित होऊ शकते. हे डोळे, ओठ किंवा गाल यांच्याभोवती दिसू शकते. कधीकधी, हे जननेंद्रियांमध्ये किंवा घशाच्या आत किंवा पोटामध्ये देखील असू शकते.

कीटक आणि पाळीव प्राण्यांची अलर्जी

पाळीव प्राण्यांच्या अलर्जीची लक्षणे धुळीच्या अलर्जीसारखी असतात आणि ते एखाद्या प्राण्याच्या संपर्कात आल्यानंतर दिसतात. कीटक अलर्जीचे लक्षणे खालीलप्रमाणें:

खाद्य पदार्थांची अलर्जी

यामध्ये लक्षणे खाण्याआधी किंवा खूप तासांनंतर दिसू शकतात. त्यामध्ये लाल, खारट त्वचा, पडसे, मळमळ, उलट्या, आकड्या आणि अतिसार समाविष्ट असतात. काही लोकांमध्ये, खाद्य पदार्थांच्या आलर्जीमुळे अॅनाफिलेक्सिस नामक गंभीर स्थिती होऊ शकते ज्यामध्ये खालील लक्षणे दिसतात:

  • छातीत जडपणा.
  • जीभ, घसा आणि ओठाची सूज.
  • हात आणि पायात झिणझिण्या येणे.

अ‍ॅलर्जी चा उपचार - Treatment of Allergy in Marathi

अलर्जीवरील उपचार वैद्यकीय इतिहास, लक्षणांची तीव्रता आणि अलर्जी चाचण्यांकडून मिळालेल्या परिणामांवर अवलंबून असते. हे पुढील चरणांमध्ये केले जाते:

  • अलर्जी संप्रेरकाला टाळणें
    अलर्जी टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग ट्रिगरिंग एजंटचे संसर्ग  टाळणें किंवा कमी करणें हा आहे. यामुळे औषधांची आवश्यकता कमी होते तसेच स्त्रोत काढून टाकण्यास मदत होते. "जलनेती"  किंवा स्क्वीझ बॉटल वापरुन नियमितपणे नाक सिंचनद्वारे वायुवाहीत अलर्जी संप्रेरक कमी करता येतात.
  • औषधे
    अॅन्टीहिस्टॅमिनसारख्या अलर्जीरोधी औषधे  डेंकॉंजेस्टेंट्ससह अलर्जीमध्ये आढळणारी सूज कमी करण्यास मदत करतात. अॅन्टीहिस्टॅमिन अल्स्टरिक प्रतिक्रिया दरम्यान उत्सर्जित होणारे एक रसायन, हिस्टामाइन यावर प्रतिबंध करते, ज्यामुळे नाक गळणें किंवा पडसे रोखले जाते. डेंकॉंजेस्टेंट्स सुजलेल्या नाकाच्या मेंब्रेनना संकुचित करून सूज कमी करतात. त्वचेच्या तक्रारींमध्ये, कॉर्टिकोस्टिरॉईड्स चकत्यांचा पसार थांबवतात.
  • प्रतिरोध पद्धत
    काही लोकांमध्ये इम्यूनोथेरपीची सल्ला दिली जाते. यामध्ये परागकण, पाळीव प्राणी, कीटकांचे अलर्जी आणि दमा असलेले लोक समाविष्ट आहेत. हे उपचार अलर्जीसंप्रेरकांचे संपर्क आणि सहनशीलतेत सुधारणेसह लक्षणे कमी करण्यास मदत करतात. इम्यूनोथेरपी खाद्य पदार्थांच्या अलर्जीसाठी उपयुक्त असल्याचे सिद्ध होत नाही, जरी त्याच्या प्रभावितेसाठी अनेक अभ्यास केले जात आहेत.

जीवनशैली व्यवस्थापन

योग्य व्यवस्थापनाद्वारे अलर्जी टाळणे सर्वोत्तम आहे. डॉक्टरांबरोबर एकोप्याने काम करून अलर्जीसंबंधी प्रतिक्रिया हाताळण्यास मदत होते. एलर्जन्सच्या संपर्कात येण्यापासून टाळल्यास प्रसगांवर  आणि संपर्कस्त्रोतालाही मर्यादा घालता येते. जर एखाद्या व्यक्तीस गंभीर प्रतिक्रिया होण्याचा धोका असेल तर नेहमीच सोबती एपिनेफ्राइन इंजेक्शन ठेवावे. गंभीर अलर्जीक प्रतिक्रियांसाठी हा एकमात्र उपाय आहे आणि डॉक्टरांनी सांगितल्यावरच मिळते. जिथे व्यक्तीला संवाद करण्यास अडचण होत असेल,अशा अलर्जी असलेल्या लोकांना गंभीर प्रतिक्रियेच्या ठिकाणी वैद्यकीय चेतावणी ब्रेसलेट घालण्याचा सल्ला दिला जातो.

myUpchar doctors after many years of research have created myUpchar Ayurveda Urjas Energy & Power Capsule by using 100% original and pure herbs of Ayurveda. This Ayurvedic medicine has been recommended by our doctors to lakhs of people for problems like physical and sexual weakness and fatigue, with good results.
Power Capsule For Men
₹495  ₹799  38% OFF
BUY NOW


संदर्भ

  1. Asthma and Allergy Foundation of America. [Internet] Maryland, United States; Asthma and Allergy
  2. European Academy of Allergy and Clinical Immunology [Internet] Zurich, Switzerland; Allergy Prevention Recommendations
  3. Canonica GW, Ansotegui IJ, Pawankar R, Schmid-Grendelmeier P, Van Hage M, Baena-Cagnani CE, Melioli G, Nunes C, Passalacqua G, Rosenwasser L, Sampson H. A WAO - ARIA - GA²LEN consensus document on molecular-based allergy diagnostics. World Allergy Organization Journal. 2013 Dec;6(1):1. PMID: 24090398
  4. European Academy of Allergy and Clinical Immunology [Internet] Zurich, Switzerland; Tackling the Allergy Crisis in Europe - Concerted Policy Action Needed
  5. Prasad R, Kumar R. Allergy situation in India: what is being done?.. Indian J Chest Dis Allied Sci. 2013 Jan-Mar;55(1):7-8. PMID: 23798082
  6. American College of Allergy, Asthma & Immunology, Illinois, United States. Types of Allergies
  7. American College of Allergy, Asthma & Immunology, Illinois, United States. Dust Allergy
  8. Tarun Kumar Dutta, V Mukta. Indian Guidelines and Protocols: Bee Sting. Section 12 Toxicology, Chapter 92; The Association of Physicians of India [Internet]
  9. Center for Disease Control and Prevention [internet], Atlanta (GA): US Department of Health and Human Services; Food Allergies in Schools
  10. American College of Allergy, Asthma & Immunology, Illinois, United States. SKIN ALLERGY
  11. American College of Allergy, Asthma & Immunology, Illinois, United States. Pet Allergy
  12. Asthma and Allergy Foundation of America. [Internet]. Maryland, United States; Preventing Allergic Reactions and Controlling Allergies
  13. American College of Allergy, Asthma & Immunology, Illinois, United States. Anaphylaxis

अ‍ॅलर्जी साठी औषधे

Medicines listed below are available for अ‍ॅलर्जी. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.

Lab Tests recommended for अ‍ॅलर्जी

Number of tests are available for अ‍ॅलर्जी. We have listed commonly prescribed tests below: