दारुचे व्यसन काय आहे?
व्यक्ती जेव्हा दारूवर आश्रित किंवा दारूसाठी आसक्त होतो त्याला दारू वापारचा विकार किंवा दारूचे व्यसन आहे असे म्हणतात. असे लोकं आनंदासाठी कमी पण अवलंबनामुळे किंवा गरजेसाठी जास्त पितात. मद्यपान करणाऱ्या बहुतेक लोकांना त्याचा नकारात्मक परिणाम माहित असूनसुद्धा स्वत: ला दारू पिण्यापासून थांबवू शकत नाही. मद्यपानामुळे काम आणि करिअर, आर्थिक स्थिरता आणि नातेसंबंधावर परिणाम होतो.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
विविध प्रकारचे शारीरिक आणि वागणूकीतील वर्तनाचे लक्षणे दारूचे व्यसन असलेल्यांमध्ये आढळतात, जसे :
- दारूची लत लागणे.
- शरीरामध्ये दारू पिण्याची सहनशीशक्ती वाढणे.
- मळमळ, क्रॅम्पिंग आणि दिशाभूल सारखी लक्षणे.
- शुद्वीत असताना अचानक थरथरणे.
- मद्यपानानंतर गोष्टी विसरणे.
- सामाजिक संवादाचा आणि शिष्टाचाराचा तिटकारा असणे.
- व्यवस्थित न जेवणे आणि अस्वच्छ राहणीमान.
- शाळा किंवा कामात अनुपस्थिति आणि निष्काळजीपणा.
- समस्येबद्दल बोलणे टाळणे, विचारल्यास हिसंक होणे.
- काम, नातेसंबंध आणि आर्थिक अडचणी उद्भवल्या नंतर ही निरंतर मद्यपान करणे.
- डिहायड्रेशन आणि सिरोसिस.
याची कारणं काय आहेत?
दारूच्या व्यसनेचे अचूक कारण शोधणे कठीण आहे, जरी समस्या उद्भवण्यासाठी काही परिस्थिती जवाबदार असू शकते. आठवड्यातून 12 पेक्षा जास्त पेय करणाऱ्या महिला, आठवड्यातून 15 पेक्षा जास्त पेय करणारे पुरुष किंवा आठवड्यात एका दिवसात 5 पेय पितात, ते दारूचे व्यसनी असतात. मद्यपानाचे संभवनीय कारणं खालील प्रमाणे आहे:
- मद्यपानाची सवय असलेले पालक किंवा जवळचे नातेवाईक.
- मित्रांचा दबाव.
- ताण आणि बाह्य दबाव.
- उदासीनता, चिंता, स्किझोफ्रेनिया.
- आत्म-सन्मानाची कमतरता.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
निदान प्रामुख्याने शारीरिक तपासणी आणि तपशीलाने केलेल्या इतिहासावर अवलंबून असतात. डॉक्टर सामान्यत: तुम्ही किती वेळा आणि किती प्रमाणात मद्यपान करता, दारू थांबवण्यासाठी काही पाऊले उचलली आहेत का, कधी ब्लॅकआउट, हिंसा, दुर्घटनेची वेळ आली आहे का, कामा-संबंधित काही समस्या उद्भवल्या का आणि रुग्णाने दारू पिऊन गाडी चालवली आहे का, असे प्रश्न विचारतात. काही प्रतिसादांचे मूल्यांकन करण्यासाठी एक साधी प्रश्नावली दिली जाऊ शकते. डॉक्टरांना दीर्घकाळापर्यंत गैरवर्तन आणि आरोग्य विषयक शंका असल्यास, यकृताच्या कार्याची तपासणी करण्यासाठी रक्ताचे नमुने घेतले जाऊ शकतात.
सर्व उपचाराच्या पद्धती दारूवरील अवलंबन कमी करण्यासाठी आणि दारू पिण्यावर प्रतिबंध आण्यासाठी असतात. दारूपासून दूर राहण्यास मदत करण्यासाठी डॉक्टर खालील गोष्टी सुचवू शकतात:
- समस्येशी संबंधित आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वैद्यकीय उपचार.
- ऑन्टाबूज नावाचे व्यसन टाळण्यासाठी किंवा थांबवण्यासाठी औषध.
- समर्थन गट - एए किंवा अल्कोहोलिक्स ॲनोनीमास हे सर्वात प्रसिद्ध समर्थन समूह आहे जे मद्यपान्यांना आधार मिळविण्यास, नियंत्रण मिळविण्यास आणि स्वस्थ जीवन जगण्यास मदत करते.
- शरीरातून विषारी पदार्थ आणि मद्य काढण्यासाठी शरीराचे डिटॉक्सिफिकेशन.
- भावनिक विकारांसाठी काउन्सिलिंग.
- सकारात्मक दृष्टीकोन आणि कौशल्यांचे संपादन करण्यासाठी सकारात्मक सुदृढीकरण आणि पुनर्वसन.
(अधिक वाचा: मद्यपान कस सोडाल?)