मल्टिपल स्क्लेरॉसीस (एम एस ) म्हणजे काय?
एमएस हा दीर्घकालीन रोग आहे ज्यात मेंदू, पाठीचा कणा, आणि डोळ्यांच्या मज्जातंतू वर परिणाम होतो. हा रोग शरीरातील प्रतिकारशक्ती आपल्याच शरीरातल्या स्नायूंवर हल्ला करत असल्याने एमएस ला स्वयंप्रतिकारक रोग असेही म्हणतात. या परिस्थितीत, शरीर मायलिन ला - चरबीयुक्त पदार्थ जो मेंदूतील आणि पाठीच्या कण्यातील मज्जातंतूच्या बाजूला असतो त्याला हानी पोहोचवतो. ह्या हानीमुळे मज्जासंस्था मेसेज पाठवण्याचे काम थांबवते किंवा त्यामध्ये बदल होतो.
याचे मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
याचे वर्गीकरण प्रथम, द्वितीय आणि तृतीय लक्षणे असे केले गेले आहे जे खालील प्रमाणे आहे:
प्राथमिक लक्षणे:
सामान्य:
- बधिरपणा आणि मुंग्या येणे.
- खाज.
- जळजळणे.
- चालायला त्रास होणे (थकणे,अशक्तपणा, स्नायूताठरता, तोल जाणे किंवा धरणीकंप).
- दृष्टी दोष .
- ब्लॅडर निकामी झाल्यामुळे बद्धकोष्ठता होणे.
- चक्कर येणे.
- लैंगिक समस्या.
दुर्मिळ लक्षणे:
- अन्न गिळताना त्रास होणे.
- बोलताना अडखळणे .
- श्वास घ्यायला त्रास होणे .
- ऐकू न येणे.
- फेफरे येणे.
- डोकेदुखी.
द्वितीय लक्षणे:
- मूत्राशयाच्या मार्गाचा संसर्ग.
- शरीर अक्रियाशील होणे.
- हालचाल न करता येणे.
तृतीय लक्षणे:
याचे मुख्य कारणे काय आहेत?
एमएस होण्याचे कारण अजूनही माहित नाही आहे. तरीही, पर्यावरणीय आणि अनुवांशिक घटक ह्या रोगाला कारणीभूत ठरतात.
काही धोकादायक घटक जे एमएस होण्यास कारणीभूत ठरतात ते खालील प्रमाणे आहेत:
- 15 ते 60 वर्षाच्या व्यक्तींना हा रोग होऊ शकतो.
- एमएस पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जास्त होतो.
- एमएस कुटुंबामध्ये कुणाला झाला असेल तर.
- एपस्टाईन-बार सारखे विषाणू एमएस साठी कारणीभूत असतात.
- ज्यांना थायरॉईड रोग, मधुमेह किंवा आतड्याच्या दाहाचा रोग असेल ते जास्त प्रभावित होतात.
- रक्तामध्ये व्हिटामिन डी ची कमी पातळी.
- विषुवरेषेपासून दूर राहणे.
- लठ्ठपणा.
- धूम्रपान.
याचे निदान आणि उपचार काय आहेत?
एमएस ची लक्षणे ही इतर बऱ्याच मज्जासंस्थेच्या लक्षणांसारखीच असतात, त्यामुळे याचे निदान करणे कठीण जाते.
डॉक्टर तुमची वैद्यकीय माहिती घेतील आणि तुमच्या मेंदूत, पाठीच्या कण्यात, आणि डोळ्यांच्या नर्व्ह मध्ये काही मज्जातंतूला इजा झाल्याच्या खुणा आहेत का हे बघतील.
एमएस च्या निदानासाठी खालील टेस्टची मदत होते:
- सारखेच लक्षण असणारा रोग शोधून काढण्यासाठी रक्ताची चाचणी.
- मज्जातंतूचे कार्य तपासण्यासाठी बॅलन्स, समन्वय, दृष्टी आणि इतर कार्याचे मूल्यांकन करणे.
- शरीराची रचना बघण्यासाठी मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग(एमआरआय) करणे.
- सेरेब्रोस्पायनल द्रवातील प्रथिनांमध्ये काही विकृती आहे का हे लक्षात घेणे.
- तुमच्या मेंदूतील इलेकट्रीकल क्रियेचे मोजमाप करणे.
एमएस ला बरे करता येत नाही, पण बरेच असे उपचार आहे ज्यामुळे शरीराच्या कार्यात सुधारणा होऊ शकते. ते खालील प्रमाणे आहेत:
- रोगाची वाढ स्लो करण्यासाठी, अटॅक न येण्यासाठी किंवा बरे करण्यासाठी, आणि लक्षणांना आराम मिळण्यासाठी औषधे दिली जातात. एमएस चा अटॅक कमी काळासाठी राहण्यासाठी किंवा तीव्रता कमी करण्यासाठी स्टिरॉइड्स दिले जातात. स्नायूंना आलेली आकडी कमी करण्यासाठी स्नायूंना शिथिलता आणणारे किंवा शांत करणारे औषध दिले जाते.
- थकवा आणि वेदना कमी करण्यासाठी आणि शरीराची ताकत आणि बॅलन्स ठेवण्यासाठी फिजिओथेरपी मदत करू शकते.
- काठी, वॉकर किंवा ब्रेसेस तुम्हाला आरामात चालायला मदत करू शकते.
- व्यायाम आणि योगा तणाव आणि थकवा कमी करतो.