क्रिप्टोकोकोसिस काय आहे?
क्रिप्टोकोकोसिस हे एक क्रिप्टोकोकस प्रजाती च्या बुरशीमुळे होणारा संसर्ग आहे. हा कबूतरांची विष्ठा किंवा न धुतलेल्या फळांच्या संपर्कामुळे मनुष्यामध्ये पसरतो. हा प्रामुख्याने फुफ्फुसे, मेंदू आणि मेनिनजेस (मेंदूचे आवरण), यांना प्रभावित करतो. यूएस मध्ये, सामान्यत: 40-60 वर्षे वयोगटातील व्यक्तींमध्ये हा आढळतो. पुरुषांना याचा त्रास स्त्रियांपेक्षा जास्त होतो. भारतात एचआयव्ही रुग्णांमध्ये प्रामुख्याने मेनिंजियल संसर्ग आढळतो आणि हे प्रमाण 2.09% इतके असल्याचे आढळून आले आहे.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
बुरशीजन्य घटकांच्या सतत संपर्कात राहिल्यास मुख्यत्वे फुफ्फुसं प्रभावित होतात आणि या लक्षणांसह दिसतात:
- खोकला.
- धाप लागणे.
- हेमोप्टायसिस (खोकल्यातून रक्त पडणे).
- छाती दुखणे.
- ताप.
जर मेनिंजायटीस असला तर खालील लक्षणे दिसून येतात:
याची मुख्य कारणं काय आहेत?
हे प्रामुख्याने क्रिप्टोकोकस न्यॉफॉर्मन्स नावाच्या यीस्ट सारख्या बुरशीमुळे होते. हे यीस्ट बहुतेक मातीत, सडलेले लाकूड आणि कबूतर किंवा चिकन यांच्या विष्ठेमध्ये आढळते; पण, बरेचदा पक्षांना याचा त्रास होत नाही. एरोसोलिज्ड बुरशीच्या कणांच्या श्वसनामुळे याचे प्राथमिक संसर्ग होते. ते सौम्य असते. हे मुख्यत्वे इम्यूनोकॉम्पेटंट व्यक्तींना प्रभावित करते.
सतत दिसणाऱ्या लक्षणांमध्ये खालील मुख्य कारणांचा समावेश असतो:
- वाढलेला इंट्राक्रेनियल दाब.
- अयशस्वी उपचार.
- औषधांना प्रतिकार.
- इतर संयोगी संसर्ग.
इतर कॉम्पिकेशन्स मध्ये खालील कारणांचा समावेश होतो:
- मेनिंजायटीस.
- आवर्ती क्रायप्टोकोकस संसर्ग.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
हेल्थकेअर प्रदाते खालील प्रमाणे निदान करतात:
- वैद्यकीय इतिहास.
- शारीरिक चाचणी.
- प्रयोगशाळेतील चाचण्या: क्रायटोकोकस न्यॉफॉर्मन्स च्या उपस्थितीसाठी रक्त, सेरेब्रोस्पिनल फ्लुइड (सीएसएफ) किंवा थुंकीचा नमुना किंवा शरीराच्या द्रवांचे परीक्षण केले जाते.
- छातीचा एक्स-रे किंवा सीटी स्कॅनला रोगाची वाढ तपासण्यासाठी सांगितली जाऊ शकते.
- सीएसएफ आणि मेंदूमध्ये वाढलेल्या सीएसएफ दाब कशाप्रकारे कमी होतो यावर लक्ष ठेवले जाऊ शकते.
उपचारांमध्ये तीन टप्प्यांमध्ये दिल्या जाणाऱ्या अँटीफंगल थेरपीचा समावेश असतो: प्रेरण, एकत्रीकरण आणि देखभाल चरण. अँटीफंगल औषधे 6 महिने किंवा त्यापेक्षा जास्त काळासाठी निर्धारित केले जाऊ शकतात. संसर्गाची तीव्रता, प्रभावित क्षेत्र आणि व्यक्तीची प्रतिकार स्थिती यावर अवलंबून औषधे दिली जातात. गर्भवती महिला, मुले आणि मर्यादित स्त्रोत असलेल्या भागात राहणा-या लोकांसाठी डोज, कालावधी आणि उपचार भिन्न असू शकतात.
- प्रेरण टप्पा: अँटीफंगल औषधांचा एक छोटा कोर्स निर्धारित केला जातो.
- एकत्रीकरण आणि देखभाल टप्पे: दीर्घकाळोपचाराने पुन्हा लागण होण्याची शक्यता कमी होते.
- बुरशीची झालेली वाढ काढण्यासाठी काहींना शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता असू शकते.
विकृती आणि मृत्यू टाळण्यासाठी लवकर निदान आणि उपचार आवश्यक आहे.
फॉलो-अपः
- प्रारंभिक क्लिनिकल प्रतिसाद दोन आठवड्यांसाठी मूल्यांकन करणे आवश्यक आहे.
- नियमित तपासणी भविष्यातील कॉम्प्लिकेशन्स टाळू शकते.