हाडाचा कर्करोग (हाडाचा कॅन्सर) - Bone Cancer in Marathi

Dr. Ayush PandeyMBBS,PG Diploma

December 28, 2018

March 06, 2020

हाडाचा कर्करोग
हाडाचा कर्करोग

हाडांचा कर्करोग (हाडाचा कॅन्सर) म्हणजे काय?

हाडांचा कर्करोग हा कर्करोगाचा एक असाधारण प्रकार आहे ज्यात शरीराच्या हाडांमध्ये असामान्य पद्धतीने वाढ दर्शविले जाते. जेव्हा हाडांमधील सामान्य पेशी हे कर्करोगास किंवा घातक बनतात किंवा शरीराच्या इतर भागातील कॅन्सर सेल्स जसे  फुफ्फुस, स्तन किंवा प्रोस्टेट ग्रंथीसारख्या शरीराच्या इतर भागातील कर्करोगाच्या पेशी हाडांमध्ये पसरतात तेव्हा हाडांचा कर्करोग होतो. हाडांचे कर्करोग हा मुख्यतः लहान मुलांना आणि किशोरवयीन मुलांना होण्याची शक्यता आहे  आणि सर्व प्रकारच्या कर्करोगाच्या 0.2% असू शकतो.

त्याचे मुख्य चिन्हें आणि लक्षणें काय आहेत?

हाडांच्या कर्करोगाचे एक सामान्य लक्षण म्हणजे हाडे आणि सांधे यामध्ये वेदना जाणवणे. एखाद्या व्यक्तीने अनुभवलेल्या लक्षणे हे प्रभावित झालेल्या भागांवर आणि कर्करोगाच्या ट्यूमरच्या आकारावर आधारित बदलू शकतात.

  • हाड आणि सांध्यांमध्ये सूज येते.
  • रोजच्या हालचालीमध्ये अडचण.
  • फ्रॅक्चर होण्याची शक्यता.
  • एकाहून जास्त फ्रॅक्चर होणे.
  • हाडांमध्ये अशक्तपणा.

इतर संशयास्पद सामान्य चिन्हें आणि लक्षणें खालीलप्रमाणे आहेतः

  • अचानकपणे वजन कमी होणे.
  • ताप .
  • घाम येणे.
  • थकवा जाणवणे.
  • हीमोग्लोबिन कमी होणे (ॲनिमिया) .

मुख्य कारणं काय आहेत?

अचूक कारणं आता पर्यंत अज्ञात आहेत. काही जोखीमींच्या घटकांमुळे हाडाचा कर्करोग होण्याची शक्यता असू शकते:

  • आनुवंशिक परिस्थिती जसे रेटिनोब्लास्टोमा (डोळ्याचा कर्करोग), कॉन्ड्रोसोर्कोमास (उपास्थिचे कर्करोग) आणि कॉर्डोमा (नॉन कॅन्सरस कार्टिलेज ट्यूमर).
  • रेडिएशन थेरपी एक्सपोजर.
  • केमोथेरपी.
  • नॉन-केंसर ट्यूमरचा इतिहास जसे पेगेट्स रोग सारखे.
  • हाडांमध्ये त्रास.
  • बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन.
  • बोन इम्प्लांट्स.  

याचे निदान आणि उपचार कसे केले जाते?

शारीरिक तपासणी आणि कौटुंबिक आणि वैयक्तिक इतिहासानंतर, डॉक्टर खालील पैकी  काही निदान परीक्षणांची चाचणी करण्यात येईल:

  • एंझाईम्स च्या असामान्य पातळीचा शोध घेण्यासाठी जे हाडे द्वारे उत्पादित होतात जसे ॲल्कलाइन फॉस्फेटेस ची चाचणी करण्यासाठी रक्त चाचणी. पण, या चाचणीने हाडांच्या कर्करोगाच्या अस्तित्वाची पुष्टी होत नाही.
  • एकापेक्षा अधिक इमेजिंग टेस्ट जसे एक्स-रे, बोन स्कॅन, एमआरआय आणि सीटी स्कॅन सारख्या कर्करोगाचे स्थान आणि आकार शोधण्यासाठी उपयोग केला जातो.
  • बायोप्सी, प्रभावित झालेल्या हाडांपासून नमुना (सॅम्पल) घेतला जातो आणि कर्करोगाच्या पेशींसाठी तपासणी केली जाते.
  • पीईटी स्कॅनने कर्करोगाचा प्रसार शरीराच्या इतर भागांमध्ये जाणून घेण्यासाठी होतो.

शस्त्रक्रियाने हाडांच्या कर्करोगासाठी एक सामान्य उपचार केला जातो. इतर अनेक उपचार आहेत जसे केमोथेरपी आणि रेडिएशन थेरेपी हे प्रत्येक व्यक्तीच्या स्थितीवर अवलंबून आहे.



संदर्भ

  1. American Cancer Society. What Causes Bone Cancer?. New York; [Internet]
  2. Anant Ramaswamy et al. Indian data on bone and soft tissue sarcomas: A summary of published study results. South Asian J Cancer. 2016 Jul-Sep; 5(3): 138–145. PMID: 27606300
  3. Better health channel. Department of Health and Human Services [internet]. State government of Victoria; Bone cancer
  4. Department of Health and Services. CANCER FACTS. National Cancer institute; Institutes of Health .
  5. Ferguson JL et al. Bone Cancer: Diagnosis and Treatment Principles.. Am Fam Physician. 2018 Aug 15;98(4):205-213. PMID: 30215968

हाडाचा कर्करोग (हाडाचा कॅन्सर) चे डॉक्टर

Dr. Akash Dhuru Dr. Akash Dhuru Oncology
10 Years of Experience
Dr. Anil Heroor Dr. Anil Heroor Oncology
22 Years of Experience
Dr. Kumar Gubbala Dr. Kumar Gubbala Oncology
7 Years of Experience
Dr. Patil C N Dr. Patil C N Oncology
11 Years of Experience
डॉक्टरांचा सल्ला घ्या

हाडाचा कर्करोग (हाडाचा कॅन्सर) साठी औषधे

Medicines listed below are available for हाडाचा कर्करोग (हाडाचा कॅन्सर). Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.